मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बायको अमेरिकेत अन् मुंबईत कांड, 76 वर्षांचा वृद्ध अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात

बायको अमेरिकेत अन् मुंबईत कांड, 76 वर्षांचा वृद्ध अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

बायको अमेरिकेला गेल्यानंतर मुंबईत एका 76 वर्षीय व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार घडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 मार्च : ऑनलाईन फ्रेंड्स बनवण्याच्या प्रयत्नात तरूण ऑनलाईन फ्रॉडर्सच्या विळख्यात सापडतायेत आणि काही घटना आत्महत्येपर्यंतच्या टोकाला जातायेत. हनी ट्रॅप, मॉर्फिंग, अलीकडील लोन अॅप ट्रॅपनंतर आता सेक्स्टॉर्शनच्या आहारी जात अनेक जण जात असल्याचे समोर येत आहेत. यातच आता मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

घाटकोपर येथील एक 76 वर्षीय निवृत्त व्यक्ती लैंगिक शोषणाच्या रॅकेटचा ताजा बळी ठरला. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडित व्यक्तीला धमकी दिली होती. महिलेने आत्महत्या केल्याचे सांगून तिचा मृतदेह रुग्णवाहिकेत नेत असल्याचा फोटो पाठवले होते, तसेच तिच्या पालकांना पोलिस ठाण्यात पाठवून पीडित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 5 लाख रुपयांची मागणी केली होती. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नेमकं काय घडलं -

घाटकोपर पोलीस आणि सायबर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. घाटकोपरमधील असल्फा गावात राहणाऱ्या पीडित व्यक्तीने तक्रार केली की, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा त्याची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्य आपल्या मुलाला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते आणि तो एकटाच होता. तेव्हा त्याला 'सोनिया शर्मा'चा फोन आला. तसेच तिने ऑनलाइन फोन सेक्स कॉलची ऑफर दिली.

Sextortion | तुम्हाला व्हिडीओ कॉलमध्ये इंटरेस्ट आहे का? या एका वाक्याने अनेकांचं आयुष्य झालं उध्वस्त!

'सोनिया'ने अर्ध-नग्न व्हिडिओ कॉल केला आणि त्याने स्वतःचे कपडे उतरवले. मात्र, "जवळपास पाच महिन्यांनंतर, 'सोनिया'ने गुड मॉर्निंग व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला आणि दावा केला की तिला तातडीने कर्जाची गरज आहे. जेव्हा पीडित व्यक्तीने सांगितले की माझ्याकडे पैसे नाहीत, तेव्हा तिने त्याच्या जागी येण्याची आणि पोलिस तक्रार दाखल करण्याची धमकी दिली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सेक्स्टॉर्शन म्हणजे काय ?

सेक्स्टॉर्शन हा सोशल मीडियामार्फत होणारा लैंगिक शोषणाचा एक प्रकार आहे. चॅटिंगशी संबंधित वेगवेगळ्या सोशल मीडियाचा यात वापर केला जातो. मुलीच्या नावाने एखादी बनावट प्रोफाइल तयार केली जाते. त्या प्रोफाईलवरून अनोळखी लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. एकदा का फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली की त्यानंतर चॅटिंग सुरु करून घट्ट मैत्री करण्याचा प्रयत्न केला जातो.

मोबाईल क्रमांक मिळवला जातो आणि त्यानं तर चॅटिंगचं रूपांतर व्हिडीओ कॉलमध्ये केलं जात. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मादक अदा दाखवून तरुणांना भुरळ पडण्याचा प्रयत्न केला जातो. स्वतः नग्न होऊन समोरच्या व्यक्तीला देखील कपडे काढण्यासाठी प्रोत्साहित केलं जात. ऑनलाइन सेक्ससाठी तरुणांना विचारणा केली जाते. नग्न तरुणी बघितल्यानंतर अनेकदा तरुण आपले कपडे उतरवण्यास तयार होतात आणि तरुण नग्न झाल्यानंतर नकळत व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो, फोटोही काढले जातात.

एकदा का त्यांच्याकडे असे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड झाले की त्यानंतर सुरु होते ऑनलाइन ब्लॅकमेलींग. संबंधित तरुणांना त्यांचेच नग्न फोटो, व्हिडीओ पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचं धमकी सत्र सुरु होत. या ब्लॅकमेलिंगमध्ये व्हिडिओ इंटरनेटवर किंवा जवळच्या मित्रांना पाठवले जाण्याची धमकी दिली जाते. जर व्हिडीओ व्हायरल होऊ द्यायचा नसेल तर पैशांची मागणी केली जाते. शक्य होईल तितके पैसे उकलण्याचा प्रयत्न केला जातो. अशा या सर्व प्रकाराला 'सेक्स्टॉर्शन' म्हणतात.

यासर्वांमध्ये मानसिक ताण तरुणांवर पडतो. पैसे देण्याची त्यांची क्षमता संपली की तरुण व्हिडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने आत्महत्येपर्यंत पोहोचतात, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Crime news, Cyber crime, Mumbai