मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

टोमणे मारणाऱ्या पत्नी आणि सासूचा मी खून केलाय! आरोपीच्या फोनने पोलिसही चक्रावले

टोमणे मारणाऱ्या पत्नी आणि सासूचा मी खून केलाय! आरोपीच्या फोनने पोलिसही चक्रावले

 आपण आपली पत्नी आणि सासूचा खून केला असून (Man murders wife and mother in law) आपल्याला घरी येऊन अटक करा, असा फोन स्वतः आरोपीनेच पोलिसांना केला.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : आपण आपली पत्नी आणि सासूचा खून केला असून (Man murders wife and mother in law) आपल्याला घरी येऊन अटक करा, असा फोन स्वतः आरोपीनेच पोलिसांना केला. सासू आणि पत्नीच्या सततच्या टोमण्यांना वैतागलेल्या आरोपीनं (Murder of wife and mother in law with gun) दोघींचीही गोळ्या घालून हत्या केली. गेल्या काही दिवसांपासून आपण टोमणे सहन करत होतो, मात्र सहन करण्याची आपली क्षमता संपल्यामुळेच (Murderer calls police) आपण हा निर्णय घेतल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.

आरोपी होता घरजावई

देशाची राजधानी दिल्लीत महेश नावाचा एक तरुण त्याची पत्नी आणि सासूसोबत राहात होता. महेशचा पाच वर्षांपूर्वी निधीसोबत प्रेमविवाह झाला होता आणि तो घरजावई म्हणून दिल्लीतील सासूच्या घरात राहत होता. गाड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारा महेश गेल्या काही दिवसांपासून सासू आणि पत्नीच्या टोमण्यांना वैतागला होता. आपण घरजावई असल्यामुळेच आपल्याला सतत टोमणे खावे लागतात, याची सल त्याच्या मनात होती. टोमणे असह्य होऊन त्याने पत्नी आणि सासूचा काटा काढायचं ठरवलं.

दोघींनाही घातल्या गोळ्या

महेशने राहत्या घरात पत्नी आणि सासूला गोळ्या घातल्या आणि ठार केलं. त्यानंतर थंड डोक्याने त्याने पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. आपण आपल्या पत्नीचा आणि सासूचा खून केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. पोलीस स्टेशनला स्वतः आरोपीचाच फोन आल्यामुळे पोलीसही हैराण झाले. घटनेची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी आरोपीने दिलेल्या पत्त्यावर धाव घेतली. त्यावेळी त्यांना सासू आणि पत्नीचा मृतदेह मिळाला. पोलिसांची वाट पाहत बसलेल्या आरोपी महेशला पोलिसांनी अटक केली.

हे वाचा -बापरे! 85 कैदी HIV POSITIVE, तुरुंगात होतोय वेगाने प्रसार; कारण ऐकून बसेल धक्का!

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी आरोपी महेशविरुद्ध कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेनं आजूबाजूच्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

First published:

Tags: Crime, Delhi, Murder