दिसपूर, 10 ऑक्टोबर : तुरुंगात विविध गुन्ह्यांची शिक्षा भोगत असलेल्या 85 कैंद्यांना (85 prisoners found HIV Positive) एचआयव्हीची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आसामच्या नगांव केंद्रीय कारागृह आणि विशेष कारागृहातील कैद्यांना एड्सची (Prisoners in Nagaon central jal and Special jail) लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या या माहितीमुळे सर्वांनाच धक्का (Shocking information) बसला आहे.
कैद्यांमध्ये वाढतोय रोग
सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कारागृहातील 45 आणि विशेष कारागृहातील 40 अशा एकूण 85 कैद्यांना एड्स झाला आहे. आसाममधील या दोन तुरुंगात गेल्या 4 महिन्यातील हे चित्र असून चार महिलांसह एकूण 88 जणांना या रोगाची बाधा झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
व्यसनाधीनतेमुळे वाढतोय एड्स
जेलमधील अनेक कैद्यांना व्यसनं आहेत. त्यासाठी अनेक कैदी एकाच सिरिंजचा वापर करून नशेची औषधं टोचून घेतात. त्यामुळे ज्या कैद्याला एड्स आहे, त्या कैद्याचे रक्त सुईवाटे दुसऱ्या कैद्याच्या शरीरात जाते. एकच सिरींज वापरून अनेकजण ड्रग्ज टोचून घेत असल्यामुळे कैद्यांमध्ये एचआयव्ही पॉझिटीव्ह असणाऱ्यांचं प्रमाण वाढत चालल्याचं चित्र आहे. तुरुंगात ड्रग्ज आणि सिरिंज पोहोचतेच कशी, असा गंभीर प्रश्न त्यामुळे निर्माण झाला असून तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
हे वाचा - VIDEO: जिलेटीनच्या कांड्यांनी घडवला स्फोट; नगरमध्ये एटीएम फोडून लाखो रुपये लंपास
काय सांगते आकडेवारी?
आतापर्यंत आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2002 ते 2021 या कालावधीत आसाममध्ये एकूण 20085 जणांना एड्सची बाधा झाली आहे. मोरीगांव, नागाव आणि नलबाडी यासारख्या ठिकाणी एचआयव्ही पॉझिटीव्ह असणाऱ्यांची संख्या दिवसदिवस वाढत चालली आहे. तुरुंगात उपलब्ध होणाऱ्या सिरिंज आणि कैद्यांमध्ये वाढत चाललेलं एड्सचं प्रमाण ही सरकारसाठी चिंताजनक गोष्ट आहे. ही आकडेवारी पुढं आल्यानंतर आता सरकार त्यावर काही उपाययोजना करतं का, हे पाहणं महत्त्त्वाचं असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.