Home /News /news /

मुलाला कोरोना, कुटुंब क्वारंटाईन केल्याने वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू, शेवटचा फोन केला आणि....

मुलाला कोरोना, कुटुंब क्वारंटाईन केल्याने वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू, शेवटचा फोन केला आणि....

वृद्ध आई-वडिलांना घरात क्वारंटाईन करण्यात आलं तर मुलगा, सून आणि नातवंडांना क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आलं. याच धक्क्यात वडिलांनी जेवण सोडलं आणि...!

    मुंबई, 19 मे : कोरोना या जीवघेण्या आजाराने लाखोंचे प्राण घेतले. काहींचा कोरोना झाला म्हणून मृत्यू झाला तर काहींचा कोरोना होईल याच्या धक्क्याने मृत्यू झाला. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईच्या भिवंडीमध्ये समोर आला आहे. मुलाला कोरोना झाल्यामुळे वृद्ध आई-वडिलांना घरात क्वारंटाईन करण्यात आलं तर मुलगा, सून आणि नातवंडांना क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आलं. याच धक्क्यात वडिलांनी जेवण सोडलं आणि काल रात्री त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भांडूपच्या उत्कर्षनगर भागात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा घरामध्ये 2 मुलं, सून, 3 नातवंडं आणि पत्नीसह 65 वर्षाचे ज्येष्ठ राहत होते. गेल्या काही दिवसांआधी त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आणि उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर घरातील सून आणि नातवंडांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं गेलं. याचा आजोबांना मोठा धक्का बसला. घरी जाण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, एसटी आणि ट्रकच्या भीषण धडकेत 3 जागीच ठार मुलगा, सून आणि नातवंड रुग्णालयात असल्यामुळे काळजीने आजोबांनी जेवण सोडलं. काल रात्री ते खूप घाबरले होते. त्यांनी सगळ्यांना फोन करण्यास सांगितलं. मुलाशी बोलणं केलं. त्याने त्यांना धीर दिला. पण रात्री झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. व्यक्तीच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण त्यांच्या पत्नीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पचीच्या जाण्याचं दुख करण्यासाठी त्यांच्यासोबत कुटुंबही नसल्याने त्या आणखी खचल्या आहेत. कोरोनामुळे या कुटुंबावर मोठं संकट आलं. वृद्धाचा अशा प्रकारे जीव गेल्यामुळे परिसरातही शोककळा पसरली आहे. कोरोना हा खरंतर शारीरिक आजार नसून तो एक मानसिक आजार आहे हेदेखील तितकेच खरे आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर किंवा होण्याआधी विचारांनीच मन खायला उठतं. त्यामुळे अशा प्रकारे जीव गमावण्याची वेळ येते. पण कोरोनावर मात करण्यासाठी जितकी लस आवश्यक आहे तितकंच आवश्यक आपली मानसिक स्थिती ठीक असणं आहे. वॉचमनची नोकरी करायचा हा बॉलिवूड सुपरस्टार, दोन वेळचं जेवण मिळणंही होतं कठीण संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या