कोल्हापूर, 19 मे : आनंदाने झेलण्यासाठी वर फेकलेल्या 8 वर्षीय बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळाला खेळवताना त्याला झेलण्यासाठी वर फेकलं. पण झेलता न आल्यामुळे ते फरशीवर झोरात पडलं आणि यातच त्याचा मृत्यू झाला आहे. 8 मे रोजी ही घटना घडली. बाळाच्या अशा मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालकल्याण संकुलात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधीत अल्पवयीन मुलाच्या जबाबानंतर मृत्यूस जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहे.
खरंतर आनंदाने बाळाला हवेत उडवत झेलण्याची आपल्याकडे लोकांनी भारी हौस असते. प्रत्येकाच्या घरी असं कोणी ना कोणी करतंच. पण असा बेफिकिरीमध्ये एखाद्याचा नाहक बळी जातो. त्यामुळे असं काहीही करताना समोरच्याच्या जीवाचा एकदा नक्कीच विचार केला पाहिजे.
मुलाला कोरोना, कुटुंब क्वारंटाईन केल्याने वडिलांचा मृत्यू, शेवटचा फोन केला आणि..
कोरोची इथल्या स्वयंसेवी संस्थेवर शासनानं कारवाई केल्यावर काही बालक बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध सुरू होता. 12 मार्चला ते संस्थेत दाखल झाले होते. त्याची बहिण याच संस्थेत होती. दरम्यान, सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, ज्याच्या हातातून बाळ पडलं तोदेखील निराधार आहे. पण त्याला बाळाचा लळा लागला होता. त्यामुळे त्याला खेळवताना हा प्रकार घडला.
ही घटना घडल्यापासून तो खूप अस्वस्थे होता. पण चौकशीदरम्यान, पोलिसांनी त्याला विश्वासात घेत समज दिली. त्यानंतर त्याने सर्व खरी हकीकत सांगितली. यानुसाक आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
घरी जाण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, एसटी आणि ट्रकच्या भीषण धडकेत 3 जागीच ठार
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.