मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ख्रिसमसच्या रात्री परदेशी तरुणीची आत्महत्या, 14 व्या मजल्यावरून मारली उडी

ख्रिसमसच्या रात्री परदेशी तरुणीची आत्महत्या, 14 व्या मजल्यावरून मारली उडी

परदेशातून टुरिस्ट व्हिसावर ती भारतात फिरायला आली होती. मात्र ख्रिसमसच्या रात्री असं काही घडलं की तिने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिला.

    नवी दिल्ली, 26 डिसेंबर: परदेशी तरुणीने (Foreigner woman) तिच्या चौदाव्या मजल्यावरील (Fourteenth Floor) फ्लॅटमधून उडी मारून आत्महत्या (Jumped to suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीनंतर अचानक या तरुणीने तिच्या राहत्या घरातून खाली उडी मारली. ख्रिसमसच्या रात्रीच तिने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नेमकं काय घडलं, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.  नातेसंबंधात होता तणाव नवी दिल्लीतील कासा ग्रीन सोसायटीत केनियाची नागरिक असणारी मुन्यासा इडाम्बो नावाची तरुणी राहत होती. तिच्यासोबत तिचा एक पुरुष पार्टनरदेखील राहत होता. पर्यटन व्हिसावर ती भारतात आली होती आणि काही दिवस तिचा मुक्काम दिल्लीमध्ये होता. नातेसंबंधातील ताणतणावांमुळे ही तरुणी मानसिकरित्या खचली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यातूनच तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशी केली आत्महत्या ख्रिसमसच्या रात्री पार्टी करण्यासाठी ही तरुणी मित्रांसोबत बाहेर गेली होती. बराच वेळ पार्टी सेलिब्रेट करून ती रात्री उशीरा घरी परतली. दिल्लीतील एका इमारतीत चौदाव्या मजल्यावर राहणाऱ्या तरुणीने त्यानंतर आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. चौदाव्या मजल्यावरील गॅलरीत ती आली आणि तिथून थेट खाली उडी मारली. चौदाव्या मजल्यावरून थेट खाली पडल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली.  हे वाचा - उपचारादरम्यान मृत्यू तरुणीने खाली उडी मारल्यानंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. परदेशातून भारतात पर्यटनासाठी आलेल्या तरुणीला आत्महत्या का करावी वाटली असेल, याच्या कारणांचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. ही आत्महत्या होती की त्यामागे हत्येचं काही षडयंत्र होतं, याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. दिल्लीतील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Delhi, Suicide

    पुढील बातम्या