हिसार, 20 डिसेंबर: मोक्षप्राप्तीच्या अंधश्रद्धेतून (Superstition of Moksha) एका व्यक्तीन आपल्या पूर्ण कुटुंबाची हत्या (Murder of family members) करून स्वतःचं जीवन संपवल्याची (Commits suicide) धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि देवभोळ्या व्यक्तीला मोक्षप्राप्तीविषयी काहीतरी गैरसमज निर्माण झाले होते. त्यातूनच त्यानं हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एखाद्या संकल्पनेचा मनावर होणारा परिणाम आणि त्यामुळे भावनेच्या भरात घेतले जाणारे निर्णय किती अघोरी असतात, याची प्रचिती या उदाहणातून आली आहे. मोक्षप्राप्तीसाठी केला खून हरियाणातील हिसार भागात राहणारा रमेश नावाचा व्यक्ती पेंटिंगचं काम करत असे. पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी म्हणूनदेखील त्याची परिसरात ख्याती होती. जर कुणाच्या घरी साप, अजगर वगैरे प्राणी आले, तर त्यांची सुखरूप सुटका करून तो त्यांना जंगलात सोडून येत असे. या कामाचे कुठलेही पैसे तो घेत नव्हता. परिसरात एक सहृदयी व्यक्ती म्हणून त्याची ख्याती होती. मात्र त्याचवेळी आपल्याला मोक्ष कसा मिळेल, याचा विचार तो सातत्यानं करत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. संन्यास घेण्याचा होता विचार काही वर्षांपूर्वी त्याला संन्यास घेण्याची इच्छा होती. मात्र पत्नी आणि मुलांच्या आग्रहाखातर त्याने ही इच्छा गुंडाळून ठेवली होती. त्याला पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता. या सर्वांसोबत आनंदानं राहणाऱ्या रमेशनं असा निर्णय घेतल्याचं पाहून सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. सर्वांचा केला खून आपल्याला या जगात राम नसून परलोकातच सौख्य मिळेल, असं त्याला वाटत होतं. त्यासाठी आपलं आयुष्य संपवून परलोकात जाण्याची त्याने तयारी केली होती. मात्र आपल्या माघारी मुलांचे आणि पत्नीचे हाल होऊ नयेत, म्हणून त्याने कुदळीने सर्वांचा खून केला. त्यानंतर वीजेचा शॉक घेऊन मरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. त्यानंतर रस्त्यावर अज्ञात वाहनाखाली उडी मारून त्याने आपलं आयुष्य संपवलं. हे वाचा- विध्वंस! राय चक्रीवादळात तब्बल 208 जणांचा मृत्यू, अन्नपाण्यासाठी लोकांचा संघर्ष पोलीस तपास सुरू पोलिसांनी रस्त्यावरून रमेशचा तर घरातून पत्नी आणि मुलांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. रमेशच्या डायरीत त्यांना मोक्ष घेण्याबाबतचे अनेक विचार लिहिल्याचं आढळलं आहे. रमेशला वेळेत काउन्सिलिंग मिळालं असतं, तर त्याने कदाचित आपला निर्णय बदलला असता, अशी चर्चा आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.