मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'राय' चक्रीवादळात तब्बल 208 लोकांचा मृत्यू, 239 हून अधिक जखमी; अन्न पाण्यासाठीही संघर्ष

'राय' चक्रीवादळात तब्बल 208 लोकांचा मृत्यू, 239 हून अधिक जखमी; अन्न पाण्यासाठीही संघर्ष

या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ रायने मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे आतापर्यंत 208 जणांचा (208 people have died)  मृत्यू झाला आहे.

या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ रायने मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे आतापर्यंत 208 जणांचा (208 people have died) मृत्यू झाला आहे.

या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ रायने मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे आतापर्यंत 208 जणांचा (208 people have died) मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

फिलीपिन्स, 20 डिसेंबर: फिलीपिन्समध्ये (Philippines) या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ रायने मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे आतापर्यंत 208 जणांचा (208 people have died) मृत्यू झाला आहे. जवळपास 239 लोक जखमी झाले असून 52 बेपत्ता आहेत. (Storm in Philippines) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Hurricane Rai) चक्रीवादळ 'राय'नं द्वीपसमूहाच्या दक्षिण आणि मध्य भागात उद्ध्वस्त केलं आहे. गुरुवारी वादळाचा तडाखा बसल्यानंतर तीन लाखांहून अधिक लोकांना आपलं घरं सोडावं लागलं आहे. तसंच, समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट्स रिकामी करण्यात आले आहेत. फिलीपीन्स रेड क्रॉसनं म्हटले आहे की, किनारी भाग पूर्णपणे ओसाड झाला आहे.

(Philippines Typhoon Killed)यापूर्वी रेड क्रॉसचे अध्यक्ष रिचर्ड गॉर्डन म्हणाले होते की, घरे, रुग्णालये, शाळा आणि रहिवाशी इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे घरांची छप्परे तुटली, झाडे उन्मळून पडली आहेत. काँक्रीटचे विजेचे खांब कोसळले, लाकडी घरे तुटली आणि गावांमध्ये पूर आला.

हेही वाचा- पुणे: दोन महिनेही टिकला नाही संसार, खून करुन पत्नीचा मृतदेह लटकवला पंख्याला

राय चक्रीवादळाची तुलना 2013 मधील हैयान चक्रीवादळाशी केली जात आहे. फिलीपिन्समधील योलांडा नावाचे हैयान हे देशातील सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक वादळ मानले जाते. ज्यामध्ये 7,300 हून अधिक लोक मरण पावले किंवा बेपत्ता झाले होते.

बोहोलला सर्वाधिक फटका बसला

प्रांतीय गव्हर्नर आर्थर याप यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर सांगितले की, यावेळी सर्वाधिक प्रभावित बेटांपैकी एक म्हणजे बोहोल. जो समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. येथे किमान 74 लोकांचा मृत्यू झाला आहे. सिरगाव, दिनागट आणि मिंडानाओ (Philippines Typhoon Latest) या बेटांवरही मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. वादळामुळे ताशी 195 किलोमीटर वेगानं वाऱ्याचा वेग आला. प्रांतीय माहिती अधिकारी जेफ्री क्रिसोस्टोमो यांनी रविवारी एएफपीला सांगितलं की, दिनागट बेटांवर किमान 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ख्रिसमसच्या वेळी वाईट परिस्थिती

सिरगाओ बेटावरील जनरल लुना या लोकप्रिय पर्यटन शहरामध्येही परिस्थिती वाईट आहे. ख्रिसमसचा आनंद घेण्यासाठी लोक येथे येतात, मात्र आता तिथे अन्नपाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. अनेक भागात दळणवळण सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे वादळामुळे झालेल्या एकूण नुकसानीचा अंदाज घेणे आपत्ती यंत्रणांना कठीण जात आहे.

हेही वाचा- आणखी एका क्रिकेट टीमचा पाकिस्तान दौरा निश्चित, काही महिन्यांपूर्वी ऐनवेळी घेतली होती माघार 

वीज पुरवठा खंडित झाला आहे. घरातील वीज गेली आहे. शोध आणि बचावासाठी हजारो सैन्य, पोलीस, तटरक्षक दल आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे. अन्न, पाणी आणि वैद्यकीय साहित्य घेऊन जाणारी तटरक्षक दल आणि नौदलाची जहाजे रवाना करण्यात आली आहेत.

First published:

Tags: Rain