जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / दांडिया खेळू न दिल्याने रागात तिघांवर हातोड्याने वार; नवी मुंबईतील खुनी थरार

दांडिया खेळू न दिल्याने रागात तिघांवर हातोड्याने वार; नवी मुंबईतील खुनी थरार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

दांडिया खेळायला मनाई केल्याने एका व्यक्तीने तिघांवर लोखंडी हातोडीने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघं गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

(प्रमोद पाटील, प्रतिनिधी) मुंबई 29 सप्टेंबर : नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दांडिया खेळायला मनाई केल्याने एका व्यक्तीने तिघांवर लोखंडी हातोडीने जीवघेणा हल्ला केला. यात जितेंद्र पटवा याने तिघांवर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघं गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत भावाचा फोन केला हॅक अन् बहिणीबद्दल पाठवले नको ते मेसेज, परभणीतील घटना आकाश जैसवाल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अभिषेक भालेराव आणि रशीद खान हे दोघं यात गंभीर जखमी झाले असून दोघांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दांडीया खेळण्यास मज्जाव केल्याचा राग मनात ठेवत युवकाने हातोड्याने तिघांच्या डोक्यावर, अंगावर घाव घातले. यात तीन जण जखमी झाले. यातील एकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं नाव जितेंद्र बाबूलाल पटवा असं आहे. ही घटना रबाळे एमआयडीसी भागातील साईनगर परिसरात घडली आहे. फिर्यादी आरोपी आणि जखमी हे सर्व एकाच परिसरात राहणारे आहेत आणि त्यांची आधीपासूनच ओळख होती. 26 तारखेला गरबा खेळत असताना आरोपी वेडंवाकडं नाचत होता. दुर्गादेवीसमोर असला नाच न करण्याचं त्याला अनेकदा सांगण्यात आलं तरीही तो वेडंवाकडं नृत्य करत असल्याने त्याला मंडपातून बाहेर काढण्यात आलं. बुलढाण्यातले शातिर चोर, ज्वेलर्सच्या दुकानात भामट्यांचा हात, पाहा VIDEO याच कारणामुळे राग मनात ठेवत आरोपीने दांडिया संपल्यानंतर मंडपात झोपलेल्या तिघांवर हातोडीने वार केले. यावेळी त्याने शिवीगाळ करत दांडिया का खेळू देत नाही? असा आरडाओरडा केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात