जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / भावाचा फोन केला हॅक अन् बहिणीबद्दल पाठवले नको ते मेसेज, परभणीतील घटना

भावाचा फोन केला हॅक अन् बहिणीबद्दल पाठवले नको ते मेसेज, परभणीतील घटना

  नातेवाईकांना त्याच्या बहिणीबद्दल अश्लिल मेसेज पाठवण्यात आले. एवढंच नाहीतर या तरुणाच्या बहिणीला सुद्धा मेसेज पाठवले.

नातेवाईकांना त्याच्या बहिणीबद्दल अश्लिल मेसेज पाठवण्यात आले. एवढंच नाहीतर या तरुणाच्या बहिणीला सुद्धा मेसेज पाठवले.

नातेवाईकांना त्याच्या बहिणीबद्दल अश्लिल मेसेज पाठवण्यात आले. एवढंच नाहीतर या तरुणाच्या बहिणीला सुद्धा मेसेज पाठवले.

  • -MIN READ Parbhani,Parbhani,Maharashtra
  • Last Updated :

अमित राय, प्रतिनिधी परभणी, 28 सप्टेंबर : परभणीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुणाचा मोबाईल हॅक करण्यात आला आणि नातेवाईकांना त्याच्या बहिणीबद्दल बदनामी करणारे मेसेज पाठवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मोबाईल अज्ञात व्यक्तींनी हॅक केला. फोन हॅक झाल्यानंतर या तरुणाच्या मोबाईलमधील इंस्टाग्राम अकाऊंट ताब्यात घेण्यात आले. या तरुणाच्या संपर्कात असलेल्या नातेवाईकांना त्याच्या बहिणीबद्दल अश्लिल मेसेज पाठवण्यात आले. एवढंच नाहीतर या तरुणाच्या बहिणीला सुद्धा मेसेज पाठवले. ( 17 महिने मृतदेह घरात असूनही दुर्गंधी कशी पसरली नाही? कानपुरमधील त्या घटनेचं सत्य ) अचानक मेसेज येत असल्यामुळे नातेवाईक गोंधळून गेले. त्यांनी या तरुणाला जाब विचारला. तर मोबाईल फोन हॅक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर या तरुणाने नवा मोंढा पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि तक्रार दाखलकेली. ( कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चोरी, गर्दीत हात साफ करताना सीसीटीव्हीत कैद ) या तरुणाच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसंच आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात