लखनऊ 27 डिसेंबर : रात्री हॉटेलमध्ये राहण्यास प्रेयसीने नकार दिल्याने प्रियकराने तिचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर आरोपी हॉटेलमधून बाहेर पडला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीत तरुणीचा मृतदेह पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी चौकशीनंतर प्रियकराला अटक केली आहे. लग्न लावून दिलं नाही म्हणून….; बोरिवलीत अल्पवयीन मुलीचा रागाच्या भरात भयानक निर्णय मिळालेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबर रोजी गाझियाबादच्या मुरादनगर भागातील शिवम विहार येथील रॉयल रेसिडेन्सी हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता मृत महिला बागपत येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर गाझियाबाद पोलिसांनी महिलेच्या पतीची चौकशी केली. चौकशीदरम्यान ती गौतम नावाच्या व्यक्तीला भेटायला जायची, असं समोर आलं. ही महिला अनेकदा त्याला भेटण्यासाठी गाझियाबादला येत असे. 25 डिसेंबर रोजी गौतम आणि महिला रॉयल रेसिडेन्सी हॉटेलमध्ये पोहोचले. गौतमला हॉटेलमध्ये महिलेसोबत रात्रभर राहायचं होतं, मात्र महिला यासाठी तयार नव्हती. ती घरी जाण्याचा हट्ट करत होती. याच गोष्टीचा राग आल्याने गौतमने महिलेचा गळा आवळून खून केला. महिलेची हत्या करून गौतम हॉटेलमधून फरार झाला होता. गौतम काहीतरी काम असल्याचं सांगून हॉटेलबाहेर गेला होता. नंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी पाहिले असता खोलीत महिलेचा मृतदेह पडलेला दिसला. मोठा पुरावा! आफताब आणि श्रद्धामध्ये नेमकं काय झालं? त्या भांडणाची ऑडिओ क्लिप हाती यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. पोलिसांनी गंगा कालव्याजवळून इलेक्ट्रॉनिक टेहळणीद्वारे गौतमला अटक केली. अटकेनंतर गौतमने पोलिसांना सांगितलं की, रात्री आठ वाजता तो महिलेसोबत रॉयल रेसिडेन्सीमध्ये पोहोचला होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.