नवी दिल्ली 24 ऑक्टोबर : हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा हत्येची पद्धत किंवा कारण थक्क करणारं असतं. सध्या अशीच एक धक्कादायक घटना राजधानी दिल्लीमधून समोर आली आहे. दिल्लीमधील गुन्हेगारीच्या घटना थांबवण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न सुरू असले तरी या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीत. आता समोर आलेलं प्रकरण दिल्लीच्या जहांगीरपुरी ठाण्याच्या परिसरातील आहे. पत्नी माहेरी गेल्याचं शेजाऱ्यांना सांगायचा; एका महिन्याने झाला हादरवणारा खुलासा, घरामागे दिसलं भयानक दृश्य या घटनेत आरोपीने युवकाची चाकूने भोसकून हत्या केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी राहुल नावाच्या युवकाला चाकूने 30 पेक्षा जास्त वेळा भोसकून त्याची हत्या केली. या परिसरात राहणाऱ्या चिराग नावाच्या तरुणाच्या बहिणीचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या प्रेमविवाहात मृत राहुलचा मोठा हात असल्याचा आरोप आहे. राहुल अनेकदा चिरागला त्याच्या बहिणीच्या प्रेमविवाहाबद्दल टोमणे मारायचा. या वादावरून शनिवारी राहुल आणि चिराग यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर चिराग आणि त्याच्या साथीदारांनी चाकूने राहुलवर हल्ला केला. जखमी अवस्थेत राहुलला बीजेआरएम रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नोकरी करते म्हणून पत्नीला अमानुष मारहाण करत व्हिडिओ बनवला; पोलिसांनी अशी घडवली अद्दल मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीच्या प्रेमविवाहाच्या वादाचा बदला घेण्यासाठी चिरागने काल रात्री राहुलला घरी बोलावून घेतलं आणि त्याच्यावर ३० हून अधिक वार केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून आता अधिक माहिती घेतली जात आहे. ही हत्या का करण्यात आली? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.