राज्यात खरंच मंदी आहे का? दारूविक्रीचे आकडे वाचून तुम्ही व्हाल थक्क

राज्यात खरंच मंदी आहे का? दारूविक्रीचे आकडे वाचून तुम्ही व्हाल थक्क

मुंबई शहरात मद्यविक्री निर्णय मागे घेण्यात आली खरी पण आता याच मद्यविक्रीमुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मे : राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मद्यविक्री संपूर्ण बंद होती. पण कालांतराने ती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मद्य खरेदीसाठी मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेकांनी मोठ्या रांगा आणि गर्दी केली. यामुळे मुंबई शहरात मद्यविक्री निर्णय मागे घेण्यात आली खरी पण आता याच मद्यविक्रीमुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात इतर भागांमध्ये मद्यविक्री सुरूच होती. चार मेपासून आत्तापर्यंत साधारणता तीनशे कोटींचा महसूल मद्यविक्रीतून राज्यसरकार मिळाल्याची माहिती सांगितली जात आहे. मुंबई वगळता राज्यात बहुतेक भागात वाईन शॉप आणि मद्यविक्री ही होम डिलिव्हरीच्या माध्यमातून सुरू केली. तसंच ऑनलाईन मद्यविक्री आणि सेवांचा परवाना देखील देण्यात येत असल्यानं अनेकांनी त्याचीदेखील ऑनलाईन नोंदणी केली आहे.

राज्यात 33 जिल्ह्यात 3 गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर जिल्हा वगळता काही जिल्ह्यांमध्ये सशर्त दारूविक्री देण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही मद्यविक्री बंद आहे. ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा सध्या देण्यात येत असून एका दिवसात गुरुवारी 34 हजार 352 ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. मद्यसेवन परवाना एक वर्षाकरिता 100 रुपये तर जीवन परवाना 1000 रुपये एवढे शुल्क करून दिला जात आहे.

राज्यात एकूण दहा हजार 791 किरकोळ मद्यविक्री पैकी पाच हजार 864 सुरू आहेत. गुरूवारी एका दिवसात सुमारे 34 हजार पेक्षा जास्त ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली आहे अशी माहिती राज्य सरकार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याा वतीने पाच हजार 984 गुन्हे नोंदवण्यात आले असून 2664 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. तर राज्यात सुमारे 16 कोटी 16 लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: May 22, 2020, 10:32 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading