नवी दिल्ली 10 जून : कौटुंबिक वाद (Family Dispute) ही आजकाल अतिशय सामान्य बाब झाली आहे. अनेकदा आपण कुटुंबातील लोकांमध्येच काही ना काही कारणावरुन भांडण झाल्याचं पाहातो. मात्र अनेकदा ही भांडणं अगदी टोकाला पोहाचतात. सध्या असंच एक प्रकरण बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून समोर आलं आहे. यात घरगुती वादानंतर दोन भावजयांनी आपल्या दिराच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला (Attack on Private Part) केला. यानंतर दिराचा मृत्यू झाला. मधुचंद्राच्या रात्री नव्या नवरीच्या पोटावर दिसले टाके, RTI मधून पत्नीचं भयंकर कृत्य उघड माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृताचा भाऊ आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून रोजी मृताच्या मोठ्या भावाच्या मुलाचा मुंडणाचा कार्यक्रम होता. याच्या तयारीसाठी घरात स्वच्छता केली जात होती. यादरम्यान मृत ध्रुवकुमार यांच्या पपईच्या झाडावर जड लाकूड पडल्याने ते झाड कोसळलं. तुटलेलं पपईचं रोप पाहून ध्रुव रागवला. यानंतर दोन्ही भावजयांना राग आला आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. Bhiwandi Crime: पतीकडून पत्नीला बेदम मारहाण, बेशुद्धावस्थेत असलेल्या पत्नीला दारुड्याने जिवंत जाळलं, भिवंडीतील धक्कादायक घटना यावर ध्रुवने आक्षेप घेतल्यानंतर त्याचा भाऊ आणि वहिनी या दोघांनी मिळून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान रागाच्या भरात भावजयांनी त्याचा प्रायव्हेट पार्ट मुरडला, त्यामुळे त्याला जागीच जीव गमवावा लागला. मात्र, मारहाणीनंतर त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पतीच्या मृत्यूप्रकरणी मृताच्या पत्नीने दोन्ही दीर आणि त्यांच्या पत्नींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका जोडप्याला पोलिसांनी अटकही केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.