मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मधुचंद्राच्या रात्री नव्या नवरीच्या पोटावर दिसले टाके, RTI मधून पत्नीचं भयंकर कृत्य उघड 

मधुचंद्राच्या रात्री नव्या नवरीच्या पोटावर दिसले टाके, RTI मधून पत्नीचं भयंकर कृत्य उघड 

दिवसेंदिवस तरुणाचा संशय बळावत चालला होता. शेवटी RTI मधून आलेली माहिती पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

दिवसेंदिवस तरुणाचा संशय बळावत चालला होता. शेवटी RTI मधून आलेली माहिती पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

दिवसेंदिवस तरुणाचा संशय बळावत चालला होता. शेवटी RTI मधून आलेली माहिती पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

  • Published by:  Meenal Gangurde

भोपाळ, 9 जून : एक तरुणाचं दोन वर्षांपूर्वी लग्न ठरलं होतं. साखरपुडा झाल्यानंतर तो होणाऱ्या पत्नीसोबत कॉलवर तासनतास बोलायचा. पाहता पाहता होणाऱ्या पत्नीच्या प्रेमात पडला. यानंतर धुमधडाक्यात दोघांचं (Marriage) लग्न लावून देण्यात आलं.

शेवटी मधुचंद्राची रात्र आली, अन् तरुणाला नव्या नवरीच्या पोटावर टाक्यांसारखं काहीतरी दिसली. त्याला संशय आला. मात्र त्यावेळी तो काहीच बोलला नाही. परंपरेनुसार लग्नाच्या काही दिवसांनंतर पत्नी माहेरी गेली. मात्र अनेक दिवस उलटून गेले तरी संशयामुळे तरुण पत्नीला आणायला तिच्या माहेरी गेला नाही. यानंतर प्रकरण बिनसलं, आणि पत्नीने पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. 'आज तक'ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पतीने तपास सुरू केला...

यादरम्यान पतीला कळालं की, लग्नापूर्वी पत्नीवर अशोकनगरजवळील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यासाठी पत्नी RTI अंतर्गत चौकशी सुरू केली. आरटीआयअंतर्गत आलेली माहिती पाहून तरुणाला (pregnant before marriage) धक्काच बसला. RTI अंतर्गत आलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या तीन महिन्यांपूर्वी तरुणी गर्भवती होती. यादरम्यान तरुणीने गर्भपात केला होता. धक्कादायक म्हणजे मेडिकल रिपोर्टमध्ये लग्नापूर्वी पतीचं नावही लिहिण्यात आलं होतं.

आरटीआयअंतर्गत आलेली माहिती पतीने वकिलांच्या माध्यमातून कोर्टात सादर केली आहे. सोबतच पत्नी आणि त्याच्या कुटुंबीयांना भ्रृण हत्येचा आरोपी असल्याचंही म्हटलं आहे. तरुणाने असाही आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींना त्याला अनेकदा मारहाण केली आहे. त्यामुळे या प्रकरणात तरुणाने कोर्टाचं दार ठोठावलं आहे.

First published:

Tags: Crime news, Marriage, RTI