जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / सत्य काय? माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा, सुसाईड नोट लिहित युवकानं झाडली स्वतःवर गोळी

सत्य काय? माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा, सुसाईड नोट लिहित युवकानं झाडली स्वतःवर गोळी

 कपडे वाळू घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या.

कपडे वाळू घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या.

युवकानं सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) म्हटलं, की माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्या महिलेकडून आणि तिच्या वडिलांकडून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सतत केला जात होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 15 मार्च : बलात्काराच्या अनेक घटना देशभरातून सतत समोर येत असतात. मात्र, काही घटना अशाही असतात ज्यात विनाकारण एखाद्याला अडकवलं जातं. असंच काहीसं प्रकरण दिल्लीतल्या द्वारका परिसरातून समोर आलं आहे. एका 41 वर्षीय व्यक्तीनं स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) त्यानं आपल्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा (False Rape Case) दाखल केल्याचा उल्लेख केला आहे. युवकानं सुसाईड नोटमध्ये म्हटलं, की माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्या महिलेकडून आणि तिच्या वडिलांकडून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सतत केला जात होता. याच कारणामुळं मी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलत आहे. संबंधित युवक हा गोयल खुर्द येथील रहिवासी होता. याबद्दल अधिक माहिती देताना द्वारका येथील डीसीपी एस.के मीणा यांनी सांगितलं, की रविवारी संध्याकाळी त्यांनी व्यंकटेश्वर रुग्णालयातून फोन आला. यावेळी दिपक सांगवान नावाच्या व्यक्तीनं स्वतःवर गोळी झाडली असून तो रुग्णालयात असल्याचं सांगितलं गेलं. डीएसपींनी सांगितलं, पोलीस तपासात असं समोर आलं, की या व्यक्तीनं स्वतःवर गोळी झाडली आहे. मात्र, यावेळी युवक जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नसल्यानं पोलीस थेट घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्याच्या आईनं पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन पिस्तुल जप्त केला आहे. तसंच इतर निगडीत गोष्टीही ताब्यात घेतल्या. यावेळी घटनास्थळी आढळून आलेल्या सुसाईट नोटमध्ये आरोपीनं लिहिलं, की … ही मुलगीआणि तिचे वडील या लोकांनी मला हे पाऊल उचलण्यास भाग पाडलं आहे, मी तिला २ लाख रुपये दिले होते, त्यानंतर मुलीने ती रक्कम चेकद्वारे मला परत केली, परंतु हा चेक बाऊन्स झाला, त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयात समन्स मिळाल्यानंतर मुलीनं आणि तिच्या वडिलांनी मला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. इतकचं नाही तर तिनं माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप करत माझ्याविरोधात तक्रार दिली, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात