मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

वाईट हेतूने घरी यायचा, पती-पत्नीने केला विरोध; भररस्त्यावर महिलेसोबत भयानक कृत्य

वाईट हेतूने घरी यायचा, पती-पत्नीने केला विरोध; भररस्त्यावर महिलेसोबत भयानक कृत्य

crime news (file photo)

crime news (file photo)

घटना घडवून आणण्यासाठी आरोपी व्यक्ती आधीच नजर ठेवून होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India
  • Published by:  Khushalkant Dusane

भागलपुर, 5 डिसेंबर : दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशात खळबळ उडाले आहे. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माथेफिरुने महिलेच्या हातपायांसह तिच्या शरीराचे तुकडे करत तिची हत्याची केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील आहे. याठिकाणी नीलम देवीची शकील मियाँ नावाच्या गुन्हेगाराने संध्याकाळी उशिरा पिरपेंटी पोलीस स्टेशन हद्दीतील सिंघिया पुलाजवळ हत्या केली. शकीलने नीलमवर चाकूने अनेक वार करून तिला गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

नीलम देवी नावाच्या महिलेची शकील नावाच्या व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. घटना घडवून आणण्यासाठी आरोपी व्यक्ती आधीच नजर ठेवून होता. बाजारातून बाहेर पडल्यानंतर महिला तेथे पोहोचताच त्याने फडक्यातून शस्त्र काढून महिलेवर हल्ला केला. शकीलने नीलमचे हात, पाय, कान आणि शरीराचे अनेक अवयव कापले. तर लोकांना काही समजेपर्यंत आरोपी पळून गेला होते. ही घटना शनिवारी झाली. तर रविवारी उपचारादरम्यान नीलमचा मृत्यू झाला.

हेही वाचा - माता न तू वैरिणी! पोटच्या 15 वर्षीय मुलाची हत्या; मग घरातच खड्डा खोदून केलं थरकाप उडवणारं काम

काय आहे कारण -

या घटनेनंतर नातेवाईकांनी सकाळपासून पिरपेंटी पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकुमार यांना फोन केला. मात्र, पोलीस स्टेशन प्रभारी यांनी फोनही उचलला नाही. सोमवारी या घटनेतील आरोपी शकील मियाँ याला अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मृताची मुलगी चांगलीच संतापली आहे. ती म्हणाली की, शकील मियाँ तिच्या घरी यायचा, त्याला आईने विरोध केला आणि वडिलांनीही घरी न येण्याची सूचना केली. आईसोबत वाईट हेतू ठेवून शकील घरात येत असे, पण अशी घटना घडेल असे या लोकांना वाटले नव्हते.

याबाबत पोलिसांना यापूर्वी कोणतीही माहिती दिली नव्हती. या घटनेनंतर पोलिसांच्या वागणुकीवर हे कुटुंब अत्यंत नाराज आहे. नीलमला न्याय मिळावा, दोषीला एका महिन्यात फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder