मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई, 15 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी अखेर जेरबंद

महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई, 15 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी अखेर जेरबंद

हुलाश यादव हा मुळचा झारखंडच्या डोडगा येथील रहिवासी आहे.

हुलाश यादव हा मुळचा झारखंडच्या डोडगा येथील रहिवासी आहे.

हुलाश यादव हा मुळचा झारखंडच्या डोडगा येथील रहिवासी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 : याचवर्षी एप्रिल महिन्यामध्ये पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना अटक केली होती. यात एक महिला नक्षलीचाही समावेश होता. यातील दोन जहाल नक्षलवाद्यांवर 14 लाखांचे तर उर्वरित दोघांवर 4 लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत 15 लाख रुपयांचे बक्षिस असलेल्या नक्षलवाद्याला अटक केली आहे. नालासोपाऱ्यातून त्याला अटक करण्यात आली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

हुलाश यादव, असे या 45 वर्षीय अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. तसेच माओवादी संघटनेचा सदस्य आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले आहे. सरकारने त्याच्यावर 15 लाखांचे बक्षीस ठेवले होते.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, हुलाश यादव हा रविवारी पहाटे नालासोपारा येथील रामनगर येथील धानवीतील एका चाळीत औषधोपचाराकरीता येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यानुसार पथकाने सापळा रचत याठिकाणी छापा टाकून यादवला ताब्यात घेतले.

2004 पासून सक्रिय -

हुलाश यादव हा मुळचा झारखंडच्या डोडगा येथील रहिवासी आहे. तो सन 2004 पासून नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. तसेच तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकाने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटी सदस्यदेखील आहे. त्याच्यावर सरकारने 15 लाखांचे बक्षीस ठेवले होते. त्याला महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथून अटक केली आहे. आरोपीबाबत झारखंड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.

हेही वाचा - ट्रेनमध्ये बसताच पत्नीचा मृत्यू, पतीला कल्पनाही नव्हती; मृतदेहासोबत केला 500 KM प्रवास अन् मग..

एप्रिल महिन्यातही चार नक्षलवाद्यांना अटक - 

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातही एप्रिल महिन्यात चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस जवान गस्तीवर असताना नेलगुंडा येथे काही नक्षलवादी आल्याची माहिती गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र, पोलीस आल्याची चाहुल लागताच एका घरात साध्या वेशात असलेल्या त्या चार नक्षलवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी पाठलाग करत त्यांना पकडले.

बापू उर्फ रामजी दोघे वड्डे (30, रा.नेलगुंडा ता.भामरागड), मारोती उर्फ अंतुराम उर्फ माणिक साधू गावडे (34, रा. कनोली ता.धानोरा) बापूची पत्नी सुमन उर्फ जन्नी कोमटी कुड्यामी आणि अजित उर्फ भरत अशी अटक करण्यात आलेल्यांमध्ये यांचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: ATS, Crime news, Nalasopara