सतना, 21 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील सतना (Satna, Madhya Pradesh) इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका डेन्टिस्टने (dentist) आपल्या अनैतिक संबंधांना (affair) लपवण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं आहे.
सतना इथं एका आशुतोष त्रिपाठी नावाच्या डेन्टिस्टचे त्याच्या क्लिनिकमध्ये (clinic) काम करणाऱ्या युवतीसोबत अनैतिक संबंध होते. ही युवती त्याच्याकडे सर्जन (surgeon) म्हणून काम करत असे. या डेन्टिस्टनं आपल्याच प्रेमिकेची हत्या (murder) केली. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये प्रेमसंबंध (love affair) होते.
हत्येनंतर युवतीचा मृतदेह (dead body) आपल्याच क्लिनिकच्या बाजूला जमिनीत खड्डा करून त्यानं पुरला. हा खड्डा खोदण्यासाठी त्यानं मजूर लावले. या मृत प्रेयसीच्या आईनं 1 फेब्रुवारी रोजी आपली 23 वर्षीय मुलगी भानू केवट हरवल्याची तक्रार दिली होती. चौकशीदरम्यान आरोपी डेन्स्टिस्ट अनेक दिवस पोलिसांना हुलकावण्या देत राहिला. पण शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडत त्यानं गुन्हा कबूल केला.
त्याचं म्हणणं आहे, की ही तरुणी आपल्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. यातून सुटका करून घेण्यासाठी त्यानं तिची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, या डॉक्टरनं आधी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तिनं लग्नासाठी आग्रह सुरू केल्यावर मात्र डॉक्टरनं थेट तिची हत्या केली. क्लिनिकच्या बाजूला खड्डा खोदत त्यात तिचा मृतदेह पुरला.
या मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी त्यानं चक्क एका मेलेल्या कुत्र्यालाही (dog) पुरलं. पोलिसांनी भानू केवट हिची हत्या करून पुरावे नष्ट केल्याच्या आरोपात त्रिपाठीला अटक केली आहे.
हेही वाचाएका विहिरीजवळून हाकललं; दुसऱ्या विहिरीत मुला-मुलीसह वडिलांची उडी मारून आत्महत्या
लग्नाचा दबाव वाढल्याने नाराज झालेल्या या डॉक्टरनं 14 डिसेंबरला संध्याकाळी या तरुणीची हत्या केली. 15 डिसेंबरला तिचा मृतदेह पुरून टाकला. आता पोलिसांना भानूचा मृतदेह हाती लागला असून त्यांनी तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.