मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप, नोकरी गेली...7 वर्षं तुरुंगात..अखेर प्रकरण निघालं खोटं, कोर्टाचे सुटकेचे आदेश

विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप, नोकरी गेली...7 वर्षं तुरुंगात..अखेर प्रकरण निघालं खोटं, कोर्टाचे सुटकेचे आदेश

न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की, CMO ने स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळाच्या अहवालात असं म्हटलं आहे की, वैद्यकीय तपासणी आणि अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भधारणा किंवा गर्भपात झाल्याचे कोणतेही पुरावे दिसून आले नाहीत.

  • Published by:  Digital Desk

लखनऊ, 5 मे : शिक्षकावर आपल्याच विद्यार्थिनीसोबत लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी शिक्षकाने या घटनेत आपला सहभाग नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. नोकरी गेली. सात वर्षं तुरुंगात राहावं लागलं. समाजात अप्रतिष्ठा झाली. आता पोक्सो कोर्टाला (Lucknow Pocso Court) हे प्रकरण चुकीचं असल्याचं आढळलं आहे. यानंतर या शिक्षकाची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली (KV Gomtinagar Chemistry Teacher Acquitted from Student Sexual Assault Case). न्यायालयाने शिक्षकाच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणाची चर्चा होत आहे.

हे प्रकरण लखनऊच्या केंद्रीय विद्यालय गोमतीनगरचे आहे. येथील रसायनशास्त्राचे शिक्षक रामचंद्र तिवारी यांच्यावर 12 वीच्या विद्यार्थिनीने लैंगिक छळ आणि गर्भपात करायला लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ही बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. शिक्षक तिवारी यांना अटक झाली. सात वर्षांपासून तुरुंगात असलेल्या या रसायनशास्त्राच्या शिक्षकाची आता लखनऊच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात शिक्षक रामचंद्र तिवारी यांना गोवण्यात आल्याचं न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे. आता त्यांच्या सुटकेचा आदेश जारी करण्यात आला आहे.

मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला गुन्हा

15 डिसेंबर 2014 मध्ये मुलीवर रसायनशास्त्राच्या शिक्षकाने बलात्कार केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने दाखल करण्यात आली होती. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी अतिरिक्त वर्गात सहभागी होण्यासाठी ही मुलगी शाळेच्या आवारातील शिक्षकाच्या शासकीय निवासस्थानी गेली असता, ही घटना घडली. शिक्षकाने तिला गुंगी येणारं पेय दिल्याचा आरोप होता. ती बेशुद्ध पडल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसंच, कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन मुलीचं नेहमीच शोषण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून फेब्रुवारी 2015 मध्ये या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर शिक्षकाला बडतर्फ करण्यात आलं.

गर्भपाताच्या प्रकरणावर खुलासा

मुलीच्या पालकांनी दावा केला होता की, त्यांच्या मुलीचा जानेवारी 2015 मध्ये जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला होता. त्यानंतर तिने सर्व काही सांगितलं. शिक्षकाची पत्नी अनिता तिवारी, डॉ. विजयश्री आणि डॉ. आश्का सिद्दीकी यांनी तिचा गर्भपात केला आणि शिक्षकाचा अपराध लपवण्यात मदत केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. सर्व आरोपींना फेब्रुवारी 2015 मध्ये बलात्कार, गुन्हेगारी धमकी आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. शिक्षकाचे वकील नितीन खन्ना यांनी सांगितलं की, अनिता, डॉ. विजयश्री आणि डॉ. सिद्दीकी यांना सहा महिन्यांनंतर जामीन मिळाला. पण रामचंद्र तिवारी तुरुंगातच राहिले.

हे वाचा - 11 लाख चोरून टॅटूची हौस भागवली, पोलिसांनी टाकला असा डाव; चालाख चोरटे आले जाळ्यात

वैद्यकीय मंडळाने अनेक गोष्टींचा खुलासा केला

न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की, CMO ने स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळाच्या अहवालात असं म्हटलं आहे की, वैद्यकीय तपासणी आणि अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भधारणा किंवा गर्भपात झाल्याचे कोणतेही पुरावे दिसून आले नाहीत.

उलटतपासणीदरम्यान मुलगी आणि तिच्या पालकांचं म्हणणंही परस्परविरोधी होतं. मुलीने आधी सांगितलं की, ती आरोपीच्या घरी एकटीच शिकत होती. पण नंतर तिच्यासोबत इतर काही विद्यार्थीही शिकत असल्याचं तिनं सांगितलं. तिला 9 जानेवारी 2015 रोजी अल्ट्रासाऊंडसाठी नेण्यात आलेल्या डायग्नोस्टिक सेंटरचं नावही सांगता आलं नाही.

हे वाचा - खुनाचे पुरावे झाडाखाली ठेवले अन् माकडानं पळवले; कोर्टात पोलिसांची तारांबळ

आरोपी तुरुंगात आहे, त्यामुळे तो कोणतंही नुकसान करू शकत नाही, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. निदान डायग्नोस्टिक केंद्राचं नाव जाहीर न करण्यात काही अर्थ नाही. चौकशी आणि उलटतपासणी दरम्यान असे आढळून आलं की, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या निवासस्थानी नव्हे तर, वर्गात शिकवलं जात होतं. 9 जानेवारी 2015 रोजी तिला अल्ट्रासाऊंडसाठी नेण्यात आल्याचं दावाही न्यायालयात केला होता. बलात्काराची कथित घटना 15 डिसेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात आलं. अशा स्थितीत वैद्यकीय परिभाषेत हे शक्यच नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

First published:

Tags: Crime news, Rape, Sexual assault