मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Builder murder: 11 लाखांची चोरी करून टॅटूची हौस भागवली,पोलिसांनी टाकला असा डाव; चालाख दरोडेखोर अडकले जाळ्यात

Builder murder: 11 लाखांची चोरी करून टॅटूची हौस भागवली,पोलिसांनी टाकला असा डाव; चालाख दरोडेखोर अडकले जाळ्यात

सीसीटीव्हीच्या तपासात पोलिसांना घटनेच्या आदल्या रात्री 2 मुले बाईकवर लेनमध्ये येताना दिसली. मात्र, पुन्हा मागे बाईकवर जाताना दिसली नाही. अधिक तपासात पोलिसांना कळाले की, दोन्ही आरोपींनी एक दिवसापूर्वी दुचाकी लपवून ठेवली होती.

सीसीटीव्हीच्या तपासात पोलिसांना घटनेच्या आदल्या रात्री 2 मुले बाईकवर लेनमध्ये येताना दिसली. मात्र, पुन्हा मागे बाईकवर जाताना दिसली नाही. अधिक तपासात पोलिसांना कळाले की, दोन्ही आरोपींनी एक दिवसापूर्वी दुचाकी लपवून ठेवली होती.

सीसीटीव्हीच्या तपासात पोलिसांना घटनेच्या आदल्या रात्री 2 मुले बाईकवर लेनमध्ये येताना दिसली. मात्र, पुन्हा मागे बाईकवर जाताना दिसली नाही. अधिक तपासात पोलिसांना कळाले की, दोन्ही आरोपींनी एक दिवसापूर्वी दुचाकी लपवून ठेवली होती.

नवी दिल्ली, 04 मे : अतिशय चालाखीने केलेली चोरी पकडून दाखवण्यात पोलिसांनी यश मिळवलं आहे. 76 वर्षीय व्यापाऱ्याची हत्या करून 11 लाखांचा लुटलेला ऐवज पोलिसांनी परत मिळवला, विशेष म्हणजे दोन अल्पवयीन मुलांनी हा दरोडा घातला होता. त्यांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी मास्टर प्लॅन बनवलेला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला आणि त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

आज तकने दिलेल्या बातमीनुसार, राजधानी नवी दिल्लीतील सिव्हिल लाइन्समधील व्यापारी रामकिशोर अग्रवाल (76) यांच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. दोन अल्पवयीन मुलांनी हा दरोडा आणि खुनाचा कट रचला होता. आरोपींकडून लुटलेले विदेशी चलन आणि घड्याळे असा 11 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यासोबतच चौकशीदरम्यान आरोपींनी केलेले खुलासे ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

दिल्लीतील व्हीव्हीआयपी परिसरात ही घटना घडण्यापूर्वी दोघांनी बाईक चोरली होती. त्यानंतर चोरीचा माल लपवण्यासाठी मुकुंदपूर येथे भाड्याने खोलीही घेतली.

-आरोपींपैकी एकाला घरातील सर्व लोकांच्या हालचालींसह दैनंदिन सवयींची माहिती होती, कारण एक आरोपी पीडितेच्या घरी आधीच काम करत होता. पैसे कोणत्या कपाटात ठेवले होते हेही त्याला माहीत होते? बंगल्यात कुत्रा कुठे राहतो? प्रत्येक गोष्टीची माहिती होती.

-कॉलनीत कोणत्या प्रकारची बंधने आहेत, हेही आरोपींना माहीत होते. यामुळेच आरोपींनी घटनेच्या आदल्या रात्री आपली दुचाकी कॉलनीत लपवून ठेवली होती. दरोड्याच्या प्रयत्नात त्यांनी वृद्ध व्यापारी राम किशोर अग्रवाल यांची हत्या केली होती. आरोपींनी घटनेनंतर दोन दिवस सार्वजनिक वाहतूक (मेट्रा, बस, ऑटो) वापरली नाही. मात्र, घटनेपूर्वी मेट्रोमधून केलेल्या प्रवासामुळे ते दोघेही अडकले.

-विशेष सीपी कायदा व सुव्यवस्था दीपेंद्र पाठक म्हणाले, मारेकऱ्यांच्या ओळखीपासून ते पकडण्यापर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी सुमारे 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, त्याशिवाय पोलिसांनी तांत्रिक निगराणीचीही मदत घेतली.

- सीसीटीव्हीच्या तपासात पोलिसांना घटनेच्या आदल्या रात्री 2 मुले बाईकवर लेनमध्ये येताना दिसली. मात्र, पुन्हा मागे बाईकवर जाताना दिसली नाही. अधिक तपासात पोलिसांना कळाले की, दोन्ही आरोपींनी एक दिवसापूर्वी दुचाकी लपवून ठेवली होती आणि रात्री परत पायी निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ते रिक्षाने गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी भिंतीवर चढून घरात प्रवेश केला.

दरोडा आणि खून केल्यानंतर दोन्ही आरोपींनी लपवलेल्या दुचाकीचा वापर करून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी दुचाकीचा क्रमांक नोंदवून तपास केला असता, ही दुचाकी दोन दिवसांपूर्वी वजिराबाद परिसरातून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.

हे वाचा - वडिलांच्या शेवटच्या इच्छेखातर 'या' बहिणींनी केलं असं काही, जाणून व्हाल थक्क

- स्पेशल सीपी क्राईम रवींद्र यादव यांनी सांगितले की, यानंतर पोलिसांनी आरोपींचा माग शोधण्यास सुरुवात केली. त्यांच्या हालचालींची माहिती गोळा करायला सुरुवात केली. यासाठी पोलिसांनी कॉलनी, मुख्य रस्ता आणि मेट्रोच्या आजूबाजूला असलेल्या सुमारे 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले.

एवढी कसरत केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. पोलिसांना त्यांच्या मेट्रो कार्डचीही माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी सर्व स्थानकांवर आरोपींसाठी अलर्ट जारी केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मे रोजी राजीव चौक मेट्रो स्टेशनवर आरोपीने मेट्रो कार्ड बदलताच पोलिसांना अलर्ट मिळाला आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले.

हे वाचा - विवाहित प्रेयसीच्या त्रासाने उचललं धक्कादायक पाऊल,आपल्या मुलीलाही पळवल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी लुटलेल्या रकमेपैकी 25 हजार रुपये खर्च केले होते, त्यापैकी त्यांनी एक महागडा स्मार्ट फोन घेतला होता आणि काही पैशांतून मुकुंदपूर परिसरातील खोलीचे भाडे दिले होते आणि हातावर टॅटूही काढले होते.

दीड वर्षांपूर्वी यातील एक आरोपी व्यापारी रामकिशोर अग्रवाल यांच्या बंगल्यावर साफसफाईचे काम करायचा आणि त्याचे वडील गाडी चालवायचे. नोकरीच्या काळातही या अल्पवयीन मुलावर चोरीचा आरोप करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीच्या वयाचे मूल्यांकन केले जात आहे. याप्रकरणी दोघांनाही कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news