जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / ठाणेकरांसाठी घोक्याची घंटा, 100 पेक्षा जास्त आहेत करोनाबाधित क्षेत्र तर...

ठाणेकरांसाठी घोक्याची घंटा, 100 पेक्षा जास्त आहेत करोनाबाधित क्षेत्र तर...

शहरात सध्या 703 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 437 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

शहरात सध्या 703 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 437 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

ठाणे, 23 एप्रिल : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात ठाणे जिल्ह्यात धोक्याची घंटा आहे. कारण ठाणे जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या 500 च्या वर गेली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त करोना बाधित क्षेत्र म्हणजेच प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. अशात कोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी ठाणेकरांनी घरात राहणं आणि सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त 161 करोनाबाधित ठाणे महानगरपालिका हद्दीत आढळले आहेत. ठाणे मनपा पाठोपाठ मिरा भाईंदर मनपा हद्दीत 114 करोनाबाधित आढळले आहे तर केडीएमसी 97, नवी मुंबई मनपा 85, बदलापूर 16, ठाणे ग्रामीण 16, भिवंडी मनपा 6, अंबरनाथ 4 आणि उल्हासनगर 1 अशी करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 23 एप्रिल : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात ठाणे जिल्ह्यात धोक्याची घंटा आहे. कारण ठाणे जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या 500 च्या वर गेली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त करोना बाधित क्षेत्र म्हणजेच प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. अशात कोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी ठाणेकरांनी घरात राहणं आणि सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त 161 करोनाबाधित ठाणे महानगरपालिका हद्दीत आढळले आहेत. ठाणे मनपा पाठोपाठ मिरा भाईंदर मनपा हद्दीत 114 करोनाबाधित आढळले आहे तर केडीएमसी 97, नवी मुंबई मनपा 85, बदलापूर 16, ठाणे ग्रामीण 16, भिवंडी मनपा 6, अंबरनाथ 4 आणि उल्हासनगर 1 अशी करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आहे. आतापर्यंत 1 हजार 786 जणांच्या कोविड 19 चाचणी निगेटिव्ह आल्या असून या संसर्दजन्य रोगामुळे ठाणे जिल्हयात 17 जंणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसंच आनंदीची बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 96 जण रुग्ण या जीवघेण्या आजारावर मात करून सुखरूप आहेत. पण या कोरोनाचा खात्मा करण्यासाठी सगळ्यांना सरकारच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. नगरमधली भीषण घटना, पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन कंटेनर उलटला राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, आली चांगली बातमी! राज्यात वयोवृद्ध रूग्णांचा मृत्यूदर सर्वाधित म्हणजेच 16.78 टक्क्यांच्या घरात आहे. वयोवृद्धांच्या प्रकृतीची काळजी घेण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता मुंबईतील वृद्धांना जास्त काळजीपूर्वक मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 15 एप्रिल रोजी राज्यातील मृत्यूदर 6.61 टक्क्यांच्या घरात होता. देशाच्या मृत्यूदराच्या तुलनेत हा दर जवळपास 3.32 टक्क्यांनी जास्त होता. 22 एप्रिल रोजी सकाळी 10 पर्यंत राज्यातील संसर्गग्रस्तांचा आकडा 5 हजार 229 च्या घरात पोहचला, तर आतापर्यंत 251 रूग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील विविध शहरांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला. दिल्ली हादरली! बाल सुधारगृहात राडा, सुरक्षारक्षकावर हल्ला करून 11 अल्पवयीन फरार संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात