मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुतणीचा जीव जडला काकावर; लग्नही केलं, मात्र 3 महिन्यातच नात्याचा मृत्यूने झाला शेवट!

पुतणीचा जीव जडला काकावर; लग्नही केलं, मात्र 3 महिन्यातच नात्याचा मृत्यूने झाला शेवट!

काका-पुतणी एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन महिन्यांपूर्वी दोघांनी घऱातून पळून जात लग्न केलं. मात्र

काका-पुतणी एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन महिन्यांपूर्वी दोघांनी घऱातून पळून जात लग्न केलं. मात्र

काका-पुतणी एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन महिन्यांपूर्वी दोघांनी घऱातून पळून जात लग्न केलं. मात्र

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 21 ऑगस्ट : बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. काका-पुतणी एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन महिन्यांपूर्वी दोघांनी घऱातून पळून जात लग्न केलं. मात्र या प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला. लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यानंतर मुलीचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तरुणीने एक व्हिडीओ शूट केला होता, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने माहेरच्यांवर गंभीर आरोप लावले आहेत.

काका-पुतणी झाले पती-पत्नी...

ही घटना बिहारमधील एका गावातील आहे. येथे 22 वर्षीय पूजा कुमारी आणि दीपक दास यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांच्यातील प्रेम इतकं टोकाला गेलं, की, दोघांनी घरात कोणालाही न सांगता पळून जात लग्न केलं. लग्नाच्या तीन महिन्यांनतर पूजा कुमारीची तब्येत अचानक बिघडली. आणि उपचारादरम्यान शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.

वहिनीला हॉटेलमध्ये नेलं, बेडवर आधीच केला होता सेटअप अन् दीराने सुरू केलं घाणेरडं कृत्य

मुलीचे वडील तातडीने लेकीच्या घरी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर पाहिलं तर सासरची मंडळी मुलीवर अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत होते. मात्र पूजाच्या वडिलांनी तब्बल 3 तासांपर्यंत मृतदेह थांबवून ठेवला. सोबतच पोलिसांनाही बोलावलं. यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, मुलीला जबरदस्ती पळवून नेण्यात आलं आणि नंतर तिची हत्या केली.

प्रियकराचा वाढदिवस प्रेयसीसाठी ठरला शेवटचा, आधी गळा चिरला, नंतर सांगितलं कारण...

आता पूजाने केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 3 महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यात ती म्हणते की, मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. माझ्यावर कोणीही जबरदस्ती केली नाही. मी दीपकवर 8 वर्षांपासून प्रेम करते. मात्र माझे आई-वडील आणि भाऊ याच्या विरोधात आहेत.

First published:

Tags: Bihar, Crime news, Marriage