जयपूर, 20 ऑगस्ट : जयपूरमधून नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. वहिनीला काम देण्याच्या बहाण्याने दीर तिला सोबत घेऊन गेला आणि नंतर कोल्डड्रिक प्यायला दिलं. वहिनीने दीरावर विश्वास ठेवला आणि त्याने दिलेलं कोल्डडिंक प्यायली. यानंतर महिलेची शुद्ध हरपली. याचा फायदा घेत दीराने वहिनीवर बलात्कार केला. इतकच नाही तर नंतर वहिनीने तक्रार करू नये यासाठी कोऱ्या कागदावर तिची स्वाक्षरी घेतली. मात्र शेवटी दीराचं हे किळसवाणं कृत्य बाहेर आलंच. मालवीय नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय महिलेने आपल्या दीराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिला कामाची आवश्यकता होती. याबाबत दीराला माहिती होतं. काही महिन्यांपूर्वी त्याने काम मिळवून देण्याचं सांगितलं होतं. या बहाण्याने तो महिलेला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. हॉटेलमध्येच काम देणार असल्याचं त्याने सांगितलं. मैत्रिणीने केला मैत्रिणीचा घात, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, विरार हादरलं आधी वहिनीवर बलात्कार केला अन्… महिलेने सांगितलं की, हॉटेलमध्ये तो मला एका खोलीत घेऊन गेला. येथे नशेचं पेय दिलं. येथे आधीच त्याने अनेक ठिकाणी मोबाइल ठेवले होते. येथे त्याने वहिनीवर बलात्कार केला आणि व्हिडीओ शूट केला. यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने अनेकदा महिलेवर बलात्कार केला. शेवटी पीडितेने आपल्या पतीला याबाबत माहिती दिली. आणि पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.