मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /प्रियकराचा वाढदिवस प्रेयसीसाठी ठरला शेवटचा, आधी गळा चिरला, नंतर सांगितलं कारण...

प्रियकराचा वाढदिवस प्रेयसीसाठी ठरला शेवटचा, आधी गळा चिरला, नंतर सांगितलं कारण...

मोनाला घराबाहेर पडण्यापासून रोखले की ती भांडण करायची. 3 महिन्यांपूर्वी ती भांडण करून तिच्या माहेरी गेली होती.

मोनाला घराबाहेर पडण्यापासून रोखले की ती भांडण करायची. 3 महिन्यांपूर्वी ती भांडण करून तिच्या माहेरी गेली होती.

मोनाला घराबाहेर पडण्यापासून रोखले की ती भांडण करायची. 3 महिन्यांपूर्वी ती भांडण करून तिच्या माहेरी गेली होती.

झांसी, 14 ऑगस्ट : उत्तरप्रदेश राज्यातील झाशी येथे प्रियकराने प्रेयसीला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून तिची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

मिळालेल्या माहितीनुसार, तालपुरा येथील मोनिका उर्फ ​​मोना अहिरवार (वय 24) हिचा विवाह साडेसहा वर्षांपूर्वी लक्ष्मीगेट येथील विजय अहिरवार याच्याशी झाला होता. त्यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. मात्र, मोना हिचे निक्की साहू उर्फ ​​निखिल याच्यासोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध होते.

तिच्या पतीने सांगितले की, "दोन वर्षांपूर्वी त्याला या नात्याबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर त्याने अनेकवेळा तिला घटस्फोट मागितला असता मोनाने नकार दिला. मोनाला घराबाहेर पडण्यापासून रोखले की ती भांडण करायची. 3 महिन्यांपूर्वी ती भांडण करून तिच्या माहेरी गेली होती. 15 दिवसांपूर्वी फोन आला होता. तिला घरी येण्यास सांगितले असता तिने काही दिवसांनी येते, असे सांगितले. मात्र, शनिवारी रात्री तिच्या हत्येची बातमी मिळाली.

मोनिका आणि निक्कीचे प्रेमप्रकरण

मोनिका उर्फ ​​मोनू अहिरवार हिचे बारागाव गेट बाहेरील रहिवासी निक्की साहू याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. दरम्यान, काल रात्री निक्कीचा वाढदिवस होता. निक्कीने मोनिकाला संध्याकाळी केक कापण्यासाठी बोलावले होते. यामुळे मोनिका आपल्या नातेवाईक महिलेसोबत नारायणबागेत गेली. तिथे मोनाचा आपल्या प्रियकरासोबत वाद झाल्यानंतर त्याने मोनिकाच्या गळ्यात चाकूने वार केले. यानंतर मोनिकाला रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.

आरोपीने सांगितले हत्येचे कारण

झाशीचे एसएसपी शिव हरी मीना यांनी सांगितले की, मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस चौकशीत सांगितले की, आमचे 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, मोनिकाच्या दागिने आणि पैशांच्या मागणीला तो कंटाळला होता. त्यामुळेच त्याने आपली प्रेयसी मोनिकाची हत्या केल्याची कबुली दिली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Murder news, Up crime news