जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / 11 वर्षांचा सुखी संसार, फक्त मोबाईल दिला नाही म्हणून पत्नीनं संपवलं आयुष्य; अरविंदला सहन झालं नाही आणि...

11 वर्षांचा सुखी संसार, फक्त मोबाईल दिला नाही म्हणून पत्नीनं संपवलं आयुष्य; अरविंदला सहन झालं नाही आणि...

मुलं पोरकी झाली असून सध्या रडून-रडून त्यांची वाईट अवस्था आहे.

मुलं पोरकी झाली असून सध्या रडून-रडून त्यांची वाईट अवस्था आहे.

11 वर्ष दोघांचा जणू राजा-राणीचा संसार सुरू होता. प्रत्येक घरात उडतात तसे त्यांच्याही घरात छोटे-मोठे खटके उडायचे, मात्र ते तेवढ्याच पुरते. परंतु या सुखी संसाराला एका मोबाईल फोनची दृष्ट लागली.

  • -MIN READ Local18 Jhansi,Uttar Pradesh
  • Last Updated :

अश्वनी कुमार, प्रतिनिधी झाँसी, 11 जुलै : आजकाल आपल्या खऱ्या आयुष्यातील स्टेटसपेक्षा सोशल मीडियावरील स्टेटसला जास्त महत्त्व असतं. त्यावरून कुटुंबांमध्ये वादही होतात. आता तर चक्क घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करून तब्बल 11 वर्षांच्या सुखाच्या संसारानंतर एका मोबाईल फोनसाठी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या झाँसी भागातील हे प्रकरण आहे. नवऱ्याने नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने बायकोने शुक्रवारी आत्महत्या केली. बायकोच्या मृत्यूचा धसका घेऊन नवऱ्यानेही आपलं आयुष्य संपवलं. अरविंद आणि राजेंद्री अशी या दोघांची नावं आहेत. दोघांना दोन मुलंदेखील आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ही मुलं पोरकी झाली असून सध्या रडून-रडून त्यांची वाईट अवस्था आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अरविंद आणि राजेंद्रीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघं एकमेकांसाठी अगदी जीव द्यायलाही तयार होते. याच प्रेमातून कुटुंबियांच्या विरोधात जाऊन त्यांनी 2012 साली लग्नगाठ बांधली. सात जन्म एकमेकांची साथ सोडायची नाही, अशी शप्पथ त्यांनी त्यावेळी घेतली होती. 11 वर्ष दोघांचा जणू राजा-राणीचा संसार सुरू होता. प्रत्येक घरात उडतात तसे त्यांच्याही घरात छोटे-मोठे खटके उडायचे, मात्र ते तेवढ्याच पुरते. परंतु या सुखी संसाराला एका मोबाईल फोनची दृष्ट लागली. राजेंद्रीने अरविंदकडे नव्या मोबाईलची मागणी केली होती. परंतु अरविंदने तिला मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला. एवढ्याशा कारणावरून राजेंद्रीचा पारा चढला. मोबाईलसाठी तिने आपल्या दोन मुलांचाही विचार केला नाही. थेट विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचा धक्का अरविंद पचवू शकला नाही. आपण मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून राजेंद्रीने एवढं टोकाचं पाऊल उचललं याबाबत राहून राहून त्याला अपराधी असल्यासारखं वाटत होतं. Pradeep Kurulkar : अग्नी-6, मिसाइल लॉन्चर ते ब्रम्होस, कुरूलकर-झाराच्या व्हॉट्सऍप चॅटने खळबळ! राजेंद्रीच्या मृत्यूला 24 तासही उलटले नाहीत, तोच अरविंदनेही विष पिऊन आत्महत्या केली. या दोन आत्महत्यांनी त्यांच्या कुटुंबियांवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेवरून आज आपण मोबाईलच्या किती आहारी गेलोय याचा प्रत्यय येतो. ही मोबाईलची गरज आहे की विकृती याचा आपण सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात