बुलडाणा, 15 मे : बुलडाणा
(Buldhana) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समलैंगिक संबंधाला विरोध
(Opposing Homosexuality) केल्याने थेट युवकाची हत्या करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरात ही घटना घडली आहे.
काय आहे प्रकरण?
बुलडाणा जिल्ह्यातील गांगलगाव येथे 10 मे रोजी युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळाला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या युवकाने समलैंगिक संबंधाला विरोध केला म्हणून त्याचा खून करण्यात आला आहे, असे पोलीस तपासात समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी कसून तपास केला असता आरोपीचे नाव शेख रईस असे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी रईस शेख याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तर जळगावात 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
जळगाव
(Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा
(Pachora) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक अत्याचार
(Gang-raped) केल्याची धक्कादायक घटना प्रकार आज समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिनही नराधमाना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे तर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात
(Pimpalgaon Hareshwar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ती गल्लीतील मैत्रीणीसोबत बोलत होती. त्यानंतर मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली.
हेही वाचा - Shocking! शिक्षिकेवर बलात्कार करून बनवला व्हिडिओ, आता धर्मांतरासाठी दबाव
रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला. गावातील 20 ते 25 जणांनी दुचाकी काढून गावातील आजूबाजूच्या शेतात शोधमोहिम राबविली. गावातील वातावरण शांत झाल्यानंतर अज्ञात 5 ते 6 जणांनी 14 वर्षीय मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केला. पीडित मुलीवर पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर गावातील महिलांच्या शौचालयाजवळ सोडून दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.