जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / धक्कादायक! अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करून धर्मांतरणाचा प्रयत्न

धक्कादायक! अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करून धर्मांतरणाचा प्रयत्न

अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करून धर्मांतरणाचा प्रयत्न

अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करून धर्मांतरणाचा प्रयत्न

एका तरुणीने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाला असून त्यानंतर बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयन्त करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अयोध्या, 15 जुलै : उत्तर प्रदेशातील अयोध्येतून लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. कोतवाली नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाला असून त्यानंतर बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयन्त करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पीडिता आणि तिच्या वडिलांच्या तक्रारी वरून महिला पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार, धर्मांतराचा प्रयत्न आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये आरोपी लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना फूस लावून त्यांची विक्री करण्याच्या कामात सहभागी असल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. मुख्य आरोपी खालिद अन्सारी विवाहित असून त्याला मुले देखील आहेत. खालिद अन्सारी याने आपल्या मित्रासह त्यांच्या 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर, तो तिला वेगवेगळ्या मशिदींमध्ये घेऊन गेला, जिथे त्याने तिचे धर्मांतर करून तिचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला.

News18लोकमत
News18लोकमत

पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. अभ्यासादरम्यान तिची दुसऱ्या विद्यार्थिनीशी मैत्री झाली. मैत्रिणी मार्फतच मुलीची आरोपी शिवम यादवशी ओळख झाली. आरोपी शिवम यादवने आपल्या मुलीची ओळख त्याचा साथीदार खालिद अन्सारी याच्याशी करून दिली. यानंतर खालिद अन्सारी आणि शिवमने मुलीवर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपी खालिद अंसारीने पीडित मुलीसोबत लग्न करण्याच नाटक केलं. तो तिचे धर्मांतरण करण्यासाठी तिला अनेक मशिदींमध्ये घेऊन गेला. तेव्हा तेथील मौलानाने तिला पाणी पाजून तिला पवित्र करायला सांगितले आणि तिचा निकाह करण्याचा सल्ला दिला. पोलीस होताच प्रेयसी झाली ‘SDM ज्योती मौर्य’, प्रियकराला बेदम मारलं पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, 13 जुलै रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला तिच्या मैत्रिणींच्या घरून अस्थाव्यस्त अवस्थेतून आणले. घरी आल्यानंतर पीडितेने सांगितले की आरोपी खालिद अन्सारी याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला त्यामुळे ती तिच्या कुटुंबीयांशी संपर्क करू शकली नाही. पीडितेची तक्रार ऐकून घेतल्यानंतर आरोपींविरुद्ध तिच्या वडिलांच्या स्टेटमेंटवर सामूहिक बलात्कार, धर्मांतराचा प्रयत्न आणि पॉक्सो कायद्यासह इतर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिस छापे टाकत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात