कलकत्ता, 14 ऑक्टोबर : गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वाढली आहे. अनैतिक संबंध, प्रेमप्रकरणं या गोष्टींमुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसंच या महिलेचे केस कापून तिची धिंडदेखील काढण्यात आली. यामुळे पुरतुली परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. `आज तक`ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पश्चिम बंगालमधल्या मालदा येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका महिलेचे केस कापून तिची धिंड काढण्यात आली. तसंच तिला मारहाणदेखील करण्यात आली आहे. पुरतुली भागात ही घटना घडली. विवाहित भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप या महिलेवर आहे. या विवाहित भाच्याने काही दिवसांपूर्वी नैराश्यातून आत्महत्या केली आहे. युवकाने आत्महत्या केल्यानंतर ही महिला फरार झाली होती. आत्महत्या केलेल्या युवकाची पत्नी आणि कुटुंबीयांनी शुक्रवारी (14 ऑक्टोबर) या महिलेला पकडलं. पतीच्या निधनामुळे संतापलेल्या पत्नीने आणि कुटुंबीयांनी या महिलेला बेदम मारहाण केली. तसंच तिचे केस कापून तिची धिंड काढली. या घटनेची माहिती मिळताच इंग्लिश बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेला ताब्यात घेतलं आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
अंधश्रद्धेतून जोडप्याने घेतले 2 महिलांचे बळी; मग मांस कापून खाल्लं, देशाला हादरवणारी घटना
मृत युवकाच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, `कॉलनीतल्या सविता नावाच्या महिलेसोबत माझ्या पतीचे अनैतिक संबंध होते. परिसरातल्या नागरिकांना याविषयी माहिती झालं होतं. कॉलनीतल्या माणसांना बोलावून याविषयी सांगितलं होतं. सर्वांनी समजावूनही ही महिला माझ्या पतीसोबत संबंध ठेवू इच्छित होती. त्यामुळे आमच्यात वादही झाला होता. दरम्यान, या आठवड्यात मंगळवारी माझा पती कामावर गेला आणि त्यानं अॅसिड प्यायल्याची बातमी मिळाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ती महिला फरार होण्याच्या प्रयत्नात होती; पण शुक्रवारी आम्ही तिला पकडलं.`
धक्कादायक! पायातील चांदीचे कडे निघत नसल्याने चोरट्यांची क्रूरता; महिलेचे दोन्ही पाय तोडले
`आमचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. माझा पती ड्रायव्हर होता. आम्हाला दोन मुलं आहेत. परंतु, त्याचे सवितासोबत अनैतिक संबंध होते. याला मी विरोध केला आणि माझ्या पतीसोबत संबंध ठेवू नको असं सांगितलं; पण तिनं ऐकलं नाही. हळूहळू माझा पती आणि सविताच्या संबंधाविषयीची माहिती सर्वांनाना झाली होती,` असं युवकाच्या पत्नीनं सांगितलं.
या महिलेला पडकल्यानंतर युवकाची पत्नी आणि कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केली, तिचे केस कापून परिसरात तिची धिंड काढली. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Love, West bengal