मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, लोणावळ्यातून एकाला बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, लोणावळ्यातून एकाला बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं वृत्त समोर आल्याने आज राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. पण ती माहिती खोटी असं आता पोलिसांच्या तपासात निषपन्न झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Chetan Patil

अमित राय, लोणावळा, 2 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं वृत्त समोर आल्याने आज राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांना याआधी एक महिन्याभरापूर्वी जीवे मारण्याचं धमकीचं पत्र मिळालं होतं. त्याआधी त्यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. या सगळ्या घडामोडींनंतर आज त्यांच्या जीवाला धोका असल्याचा फोन आल्याने खळबळ उडाली होती. पण मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षे संदर्भात माहिती देणारा जो फोन आला होता तो खोटी माहिती देणारा होता, अशी माहिती पोलीस तापासात समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्या कटाची खोटी माहिती देणाऱ्या एकाला लोणावळ्यातून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अजय वाघमारे असे आहे. तो मूळचा आटपाडी येथील रहिवासी आहे. लोणावळा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी हा दारूच्या नशेत असताना लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने हॉटेलमधून पाण्याची बाटली विकत घेतली. मात्र हॉटेल मालकाने 10 रुपयांची बाटली त्याला 15 रुपयांना दिली. जास्त किंमत लावणल्याचा राग मनात धरून हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा उद्देशाने त्याने पोलिसांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली.

(नाशिकच्या सप्तशृंगी गडावर लाखो भावी अडकले, नव्या भाविकांना नांदुरीतच रोखलं, प्रशासनाची प्रचंड दमछाक)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन चालू आहे, अशी खोटी माहिती अविनाश आप्पा वाघमारे याने पोलिसांनी दिली. त्यामुळे लोणवळा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर कलम 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा मुंबईत जात असताना तो लोणावळ्यात एका हॉटेलमध्ये थांबला होता. या दरम्यान बिलाच्या वादावरुन त्याने हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना फसविण्यासाठी पोलिसांनी हॉटेलच्या नंबरवरुन कॉल करत खोटी माहिती दिली होती.

First published:

Tags: Eknath Shinde