उल्हासनगर, 03 एप्रिल : उल्हासनगर (ulhasnagar) शहरात कोरोनाच्या काळात देखील गुन्हेगारी काही कमी होतांना दिसत नाही. उलट कोरोना काळात गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. दहशत माजवण्याच्या उद्देशाने कॅम्प नंबर एक भागात असलेल्या एका लॉज मॅनेजरसह (Lodge ) त्याच्या भावावर तिघांनी जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सगळा हल्ला लॉजच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उल्हासनगर कॅम्प 1 च्या शहाड फाटकाजवळ दिशा लॉज आहे. या लॉजमध्ये शुक्रवारी दुपारी नितीन बोथ, कमल बोथ आणि रोहित गायकवाड हे तिघे लॉजमध्ये राहणाऱ्या बांबळे या गृहस्थांना भेटण्यासाठी आले होते. भेटून झाल्या नंतर ते लॉजच्या काऊंटरवर आले आणि त्यांनी मॅनेजरला ‘आम्हाला मुली दे, दारू दे आणि बिस्लरी दे’ अशी धमकी दिली. यावर इथं असे काही धंदे चालत नाही, असे उत्तर मॅनेजरने या तिघांना दिले.
याचा या तिघांना राग आला आणि त्यांनी तीक्ष्ण हत्यार आणि लोखंडी रॉडने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्ला होता असताना मॅनेजर आणि त्यांच्या भावाने देखील याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्न केला. यात आरोपींपैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर देखील उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्विटरला दंड! आक्षेपार्ह कंटेन्टविरोधात रशियाची कडक कारवाई धक्कादायक म्हणजे, शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास भर गर्दीत हा हल्ला करण्यात आला असताना अनेकांनी बघ्यांची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आरोपींनी हातातील बोटांमध्ये लोखंडी फायटर आणि लोखंडी रॉडने लॉजमधील मॅनेजर सतीश अमीन आणि प्रकाशवर जीवघेणा हल्ला केला. यात सतीश यांच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे,तर प्रकाश याचा डोळा थोडक्यात बचावला आहे. या दोघांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.