धक्कादायक! प्रियकराला भेटण्यासाठी आजी-बाबाला द्यायची झोपेच्या गोळ्या, एकदा आजी अचानक उठली आणि...

धक्कादायक! प्रियकराला भेटण्यासाठी आजी-बाबाला द्यायची झोपेच्या गोळ्या, एकदा आजी अचानक उठली आणि...

तरुणीच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तिची आई तिला सोडून निघून गेली. पुढे आजी-बाबांनी तिला लहानाचं मोठं केलं. पण त्याच आजीची तरुणीने निर्घृण हत्या केली.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 17 जून : प्रत्येकाच्या आयुष्यात नातं महत्त्वाचं असतं. पण याच नात्याचा जीव घेतल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकरासाठी एका तरुणीने स्वत:च्या आजीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तिची आई तिला सोडून निघून गेली. पुढे आजी-बाबांनी तिला लहानाचं मोठं केलं. पण त्याच आजीची तरुणीने निर्घृण हत्या केली.

तरुणी मोठी झाल्यावर प्रेम प्रकरणामध्ये इतकी अडकली की प्रियकराला भेटण्यासाठी ती रोज आजी-आजोबांच्या अन्नामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळवायची. एक दिवस आजीने कमी खाल्लं आणि त्यांना रात्री जाग आली. आपलं पितळं उधडं पडेन या भीतीने तरुणीने प्रियकराच्या मदतीने आजीची हत्या केली. हा खळबळजनक मामला उत्तर प्रदेशातील झाशीचा आहे.

तरुणी रोज आजी आजोबांना झोपेच्या गोळ्या द्यायची आणि त्यानंतर प्रियकराला घरी बोलवायची. झाशीतील प्रेमनगर पोलीस स्टेशन परिसरात 11 जून रोजी रात्री एका सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचं प्रकरण पोलिसांनी उघड केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत आजीच्या अल्पवयीन नातीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर रोज तरुणीच्या घरी जायचा. त्यांच्यामध्ये शारीरिक संबंधदेखील होते. पण यामध्ये आजीचा अडथळा होत असल्यामुळे प्रेयसीने प्रियकराच्या मदतीने आपल्या प्रिय 63 वर्षीय आजी मुमताजचा ओढणीने गळा आवळून खून केला. आजीच्या हत्येसाठी अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला आजीनेच लहानाचं मोठं केलं होतं. मुलीचे वडील बालपणातच गेले आणि त्यानंतर आईने दुसरं लग्न केलं. त्यानंतर मुलगी तिच्या आजी-आजोबांसोबत राहत होती. आपल्याला जीव लावणाऱ्या आजीचीच हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 17, 2020, 8:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या