मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Live Video : कार्यकर्ते हार घालत असतानाच आरोग्य मंत्र्यांवर झाडली गोळी

Live Video : कार्यकर्ते हार घालत असतानाच आरोग्य मंत्र्यांवर झाडली गोळी

एका पोलीस अधिकाऱ्याने आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.  या हल्ल्यात नबा दास जखमी झाले असून, त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात नबा दास जखमी झाले असून, त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात नबा दास जखमी झाले असून, त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhubaneswar, India

नवी दिल्ली, 29 जानेवारी : ओडिशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.  या हल्ल्यात नबा दास जखमी झाले असून, त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते एका कार्यक्रमाला जात असताना पोलीस इन्स्पेक्टने हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे ओडिशामध्ये खळबळ उडाली आहे. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये आरोग्यमंत्री नबा दास यांना गोळी लागल्याचं दिसत आहे.

कार्यालयाचे उद्घाटन करणार होते 

नबा दास हे ब्रजरानगर येथील बीजू जनता दल (बीजद) च्या कार्यालयचे उद्घाटन करणार होते. वाटेमध्ये गांधी चौक आला. त्यावेळी ते कारमधून उतरून पायीच पक्षाच्या कार्यालयाकडे निघाले होते. त्याच वेळी गोपालचंद्र दास या पोलीस इंन्स्पेक्टरने गोळ्या झाडल्या. नबा दास यांना आता झारसुगुड़ा विमानतळावर आणण्यात येणार आहे. तिथून त्यांना भुवनेश्वरला उपचारासाठी हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Odisha Health Minister Naba Das sustained injuries after being shot at near Gandhi chhak near Brajarajnagar in Jharsuguda district

video: Moment of firing#Odisha #healthminister #nabadas pic.twitter.com/IVG4zNo3QW

— Himanshu Purohit (@Himansh256370) January 29, 2023

गोळीबाराचं कारण अस्पष्ट 

ओडिसा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळाची पाहणी केली आहे. ज्या पोलिसाने गोळीबार केला, त्याची गांधी चौकाच्या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी लागली होती. त्याने आपल्या सर्व्हिस रिव्हाल्व्हरमधून मंत्री नबा दास यांच्यावर गोळी झाडली. त्याने हे कृत्य का केले, याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. नबा दास यांना तातडीने एअर लिफ्ट करून भुवनेश्वरला पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे.

First published:

Tags: Live video, Video