LIVE SEX पाहणं महागात पडलं, हॅकर्सनं जाळ्यात अडकवून असा घातला गंडा!

तुम्ही इंटरनेट यूजर आहे आणि पॉर्न (अश्लिल व्हिडिओ) पाहाण्यासाठी अॅडल्ट वेबसाइट्सवर जात असाल तर सावधान!

तुम्ही इंटरनेट यूजर आहे आणि पॉर्न (अश्लिल व्हिडिओ) पाहाण्यासाठी अॅडल्ट वेबसाइट्सवर जात असाल तर सावधान!

  • Share this:
    नवी दिल्ली, 6 मे: तुम्ही इंटरनेट यूजर आहे आणि पॉर्न (अश्लिल व्हिडिओ) पाहाण्यासाठी अॅडल्ट वेबसाइट्सवर जात असाल तर सावधान! हॅकर्स कदाचित तुमच्या पर्सनल डीटेल आणि डेटापर्यंत पोहोचला असेल. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाइन अश्लिल व्हिडिओ पाहणं कोट्यवधी यूजर्सच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. एका रिपोर्टनुसार CAM 4 नामक अॅडल्ट वेबसाइटवरून सुमारे 7000GB डेटा लीक झाल्याची माहिती उजेडात आली आहे. CAM 4 ही अॅडल्ट वेबसाइट असून ती 'फ्री लाइव्ह सेक्स कॅम'ला जाहिरात देते. सायबर सिक्युरिटी रिसर्चर्सने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. कोट्यवधी यूजर्सचा पर्सनल डेटा हॅकर्सने लांबवला आहे. हेही वाचा.. उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या इम्तियाज जलील यांना भाजप नेत्याचं प्रत्युतर 'द नेक्स्ट वेब'च्या रिपोर्टनुसार लीक झालेल्या डेटामध्ये यूजरच नाव, ईमेल, पेमेंट डीटेल, आयपी अॅड्रेसशिवाय त्याच्या संभाषणाचाही समावेश आहे. रिसर्चर्सने सांगितल्यानुसार लीक डेटाबेसची साईज 7TB (7000GB) आहे. सिक्युरिटी डिटेक्टिव्ह रिसर्च टीमचे सीनियर रिसर्चर अनुराग सेन यांनी सांगितलं की, 16 मार्च ते आतापर्यंतचा डेटा लॉग आहे. या डेटाबेसमध्ये 1.88 हजार कोटी (10.88 बिलियन) रेकॉर्डचा समावेश आहे. त्यात सर्व्हर लॉग, पासवर्ड हॅश आणि कस्टमर इन्फर्मेशन आहे. क्रेडिट कार्ड आणि पेमेंट डीटेल देखील लीक रिसर्च टीमनुसार, लीक झालेल्या डेटामध्ये 1.1 कोटी ईमेल आयडी, 2.6 कोटी पासवर्ड हॅश आणि शेकडो असे रेकॉर्ड आहेत की, त्यात यूजरचं पूर्ण नाव, क्रेडिट कार्ड टाईप आणि पेड अमाउंट डीटेलचा समावेश आहे. डेटाबेसमध्ये रिसर्चर्सला यूजर्सचे यूजरनेम, जेंडर प्रेफरेंस, सेक्सुअल ओरिएंटेशन, आयपी अॅड्रेस, डिव्हाइस इन्फर्मेशन, ईमेल्स डीटेल आणि CAM4शी झालेल्या चॅट ट्रान्सक्रिप्ट मिळाल्या आहेत. हेही वाचा.. चिंताजनक! पुण्यात संसर्ग वाढला, कोरोनामुळे 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू फिशिंग अटॅकची भीती... सायबर क्रिमिनल्स या डेटाबेसचा वापर फिशिंग अटॅक आणि सायबर एक्सटॉर्शनसाठी करतात. अॅडल्ट साइट्ससाठी लीक झालेला डेटा अत्यंत धोकादायक ठरू शकतो. कारण बहुतांश यूजर आपली ओळख गोपनीय ठेवत असतात. कोट्यवधी युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती रिसर्चर्स मिळाली आहे. परंतु हॅकर्सने या डेटाबेसचा वापर चुकीच्या कामात केला की नाही, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
    First published: