मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Live-in पार्टनर हत्याकांड; मैत्रिणीने पॅक केला मृतदेह, तुरुंगात प्रेयसीने केला धक्कादायक खुलासा

Live-in पार्टनर हत्याकांड; मैत्रिणीने पॅक केला मृतदेह, तुरुंगात प्रेयसीने केला धक्कादायक खुलासा

बॅगेतून प्रियकराचा मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी तिला पकडलं.

बॅगेतून प्रियकराचा मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी तिला पकडलं.

बॅगेतून प्रियकराचा मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी तिला पकडलं.

  • Published by:  Meenal Gangurde

गाजियाबाद, 21 ऑगस्ट : लिव-इन-पार्टनर फिरोज याची हत्या करणारी आरोपी प्रीती शर्माची पोलिसांनी तुरुंगात चौकशी केली. यात तिने अनेक खुलासे केले आहे.

तिने सांगितलं की, फिरोज तिच्यावर खूप संशय घेत होता. म्हणून तिने त्याचा जीव घेतला. यासाठी तिची मैत्रिण आणि मैत्रिणीच्या प्रियकराने तिला साथ दिली. पोलिसांनी मैत्रिण तनुला शनिवारी अटक केली. तिनेही हत्येत साथ देण्याचं कबुल केलं आहे. तुलसी निकेतनमधील फ्लॅटमध्ये फिरोजची 6 ऑगस्ट रोजी हत्या करण्यात आली होती. ट्रॉली बॅगमध्ये पॅक केलेला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असताना  प्रीतीला पोलिसांनी पकडलं होतं.

चार वर्षांपासून ती फिरोजसह लिव्ह इन रिलेशनमध्ये होती. फिरोज लग्नासाठी नकार देत होता. यावेळी तिने एकटीनेही त्याची हत्या केल्याचं सांगितलं. मात्र हत्या करणे, दिल्लीतून मोठी बॅग खरेदी करून आणणे आणि मृतदेह ठिकाण्यावर लावण्यापर्यंत प्रीती एकटं हे सर्व करू शकत नव्हती.

पत्नीचे विवाहबाह्य संबंध, पतीने समजूतही काढली, पण...तरुणाने उचललं भयानक पाऊल

प्रीतीचे मोबाइल कॉल डिटेल्स तपासले तर या हत्येत तनुचे कॉल डिटेल्स समोर आले. लोकेशन तपासले तेव्हा प्रीतीसह तनु आणि तिचा प्रियकरही सोबत असल्याचं समोर आलं. यानंतर तनुलाही अटक करण्यात आली. या तिघांनी मिळून फिरोजचा मृतदेह मोठ्या बॅगेत भरला.

प्रीतीने पोलिसांना सांगितलं की, तनूने आधीच सांगितलं होतं की,फिरोजसोबत राहू नको. 6 ऑगस्ट रोजी तनू मैत्रिणीच्या फ्लॅटवर पोहोचली. तेव्हा प्रीती आणि फिरोजचं भांडण सुरू होतं. प्रीतीचे दुसऱ्या कोणाशी संबंध असल्यावरुन हा वाद सुरू झाला होता. यावेळी तनुने फिरोजला सोडून देण्याबद्दलही प्रीतीला सांगितलं. मात्र रागाच्या भरात प्रीतीने उस्तरा काढला आणि फिरोजच्या गळ्यावर वार केले.

यानंतर तनुने मृतदेह बॅगेत पॅक करण्यासाठी मदत केली. जमिनीवरील रक्ताचे डाग स्वच्छ केले. यानंतर तनुच्या प्रियकराने फिरोजचा मृतदेह कोणत्या तरी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सोडून ये, असं सांगितलं. यामुळे पोलिसांना तपास करणं कठीण जाईल.

First published:

Tags: Crime news, Delhi, Murder