अंबाला, 19 ऑगस्ट : विवाहबाह्य संबधातून खून आणि आत्महत्येसारख्या घटना समोर आल्याचे तुम्ही वाचले असेल. हरियाणाच्या अंबाला येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि तिच्याप्रकाराच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येनंतर युवकाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमुळे या घटनेचा खुलासा झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - हरियाणाच्या अंबाला कॅंटमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकरामुळे एका तरुणाने आत्महत्या केली. तरुणाजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात त्याने पत्नीने दिलेला धोका आणि तिच्या प्रियकराचा उल्लेख केला आहे. सध्या पोलिसांनी तरुणाची पत्नी, त्याच्या कुटुंबीयांसह तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अंबाला कॅन्टमध्ये राहणारा 34 वर्षीय राजेंद्र (नाव बदलले आहे) याचे दोन वर्षांपूर्वी मेरठ येथील राणी (नाव बदलले आहे) सोबत लग्न झाले होते. लग्नाच्या 2 महिन्यांनंतर त्याला पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाली होती. राजेंद्रला त्याच्या पत्नीचे राजा (नाव बदलले आहे) नावाच्या तरुणासोबत अफेअर असल्याची माहिती झाले हते. याबाबत त्याने सासरच्या मंडळींनाही याबाबत माहिती दिली, मात्र, कोणीही याबाबत बोलले नाही. तसेच त्याने पत्नीलाही समजावले. पण तिने त्याचे ऐकले नाही. समजावूनही पत्नीने राजेंद्रचे न ऐकल्याने त्याला राजेंद्रला पत्नीच्या प्रेमसंबंधाने मानसिक त्रास होऊ लागला होता. अखेर पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून राजेंद्रने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. इन्स्पेक्टर नरेश कुमार यांनी सांगितले की, मृत अरुणने पत्नीच्या अवैध संबंधाबाबत सांगितले आहे. हेही वाचा - लग्नाच्या 9 महिन्यांनंतरही शरीरसंबंधास नकार; रागाच्या भरात पतीचं धक्कादायक पाऊल तसेच या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, पत्नीचे आकाश नावाच्या तरुणासोबत राजेंद्रच्या पत्नीचे अफेअर होते. सध्या पोलिसांनी मृताची पत्नी राणी, तिचे कुटुंबीय आणि राजा नावाच्या तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.