जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Video लाईक करुन पैसे कमवा.. असा मॅसेज आला तर सावधान; क्षणात बँक खातं होईल रिकामं

Video लाईक करुन पैसे कमवा.. असा मॅसेज आला तर सावधान; क्षणात बँक खातं होईल रिकामं

सायबर गुन्हेगार

सायबर गुन्हेगार

दिवसेंदिवस देशात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे वाढत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या ट्रीक वापरुन लोकांची फसवणूक करत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 मे : व्हिडीओ लाईक करुन पैसे कमावा, अशा आशयाचा मॅसेज तुम्हालाही आला असेल तर सावध व्हा. कारण, फक्त मुंबईच नाही तर देशभरात सायबर भामट्यांकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यासाठी पार्टटाईम नोकरीचं आमिष देऊन सुरुवातीला तुम्हाला पैसे ट्रान्सफर देखील केली जाते. एकदा तुम्ही ट्रॅपमध्ये सापडला की मग सुरू होतो खेळ. कशी केली जाते फसवणूक? चला जाणून घेऊ. सायबर भामट्यांचा नवी ट्रीक मुंबई शहर तसेच संपुर्ण देशात Online Task Fraud YouTube Like च्या माध्यमातुन सामान्य जनतेला पार्ट टाईम जॉबची भुरळ घालून मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणुक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात नागरीकांना त्यांचे व्हॉट्सॅपवर मेसेजव्दारे YouTube Video Like च्या माध्यमातुन जनतेला पार्ट टाईम जॉब करण्यास उद्युक्त करुन त्याव्दारे प्रत्येक लाईकसाठी रु. 50 ते 150 पर्यंतची रक्कम नागरीकांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आमिष दाखविले जाते. नागरीकांनी पार्ट टाईम जॉब करण्यास सहमती दर्शविल्यावर प्रथम प्रायोगिक तत्वावर त्यांना टेलिग्राम खात्याशी जोडले जाते. अशा टेलिग्राम खात्यावर नागरीकांस Youtube Video प्राप्त होतात त्यास टास्क असे म्हणतात. वाचा - नवरा सारखा भांडायचा, पत्नीने 2 लाखांची सुपारी दिली आणि कायमचा आवाज केला ‘बंद’! सदर व्हिडीओ पाहून ते लाईक करुन नागरिकांनी टेलिग्राम खात्यावर पाठविल्यानंतर नागरीकांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जातात. यापुढे नागरिकांना पेड टास्क घेण्याचे व अधिक पैसे कमवण्याचे आमिष दाखविले जाते. त्यासाठी रुपये पाच हजार ते पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त इतक्या रक्कमेचे टास्क दिले जातात. पीडित जितका जास्त आमिषाला बळी पडेल तितक्या जास्त रक्कमेचे टास्क त्यास दिले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

पहिले काही लहान टास्क पूर्ण केल्याचे पैसे नागरिकांना त्यांचे बँक खात्यावर दिले जातात. मात्र, मोठ्या रक्कमेची गुंतवणूक झाल्यावर काही ना काही कारण सांगुन रिटर्नसच्या स्वरुपात मिळणारा नफा व मुद्दल देण्यास टाळाटाळ केली जाते. पुर्वीच्या टास्कची रक्कम परत मिळवण्याकरीता आणखी मोठी रक्कम भरून पुढील टास्क पूर्ण करण्याबाबत नागरीकांना भाग पाडले जाते. अशा रितीने लोकांकडून पैसे उकळुन त्यांची फसवणुक केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात