प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 18 मे : पती-पत्नीचे वाद आपल्याला काही नवीन नाही. अनेकदा हे वाद विकोपाला जाऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतले जातात. मात्र, नवी मुंबईत घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या जोडप्याचा काही ना काही कारणांवरुन सतत वाद होत होते. या वादाला कंटाळून पत्नीने पतीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे पतीला संपवण्यासाठी तिने खास पंजाबवरुन मारेकरी बोलावले होते. पतीची हत्या करण्यासाठी दोन लाखांची सुपारी या आरोपींना देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? नवी मुंबईतील कलंबोळी परिसरात एका गार्डन मध्ये 8 मे ला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. मृत व्यक्तीची ओळख पोलिसांनी पटवली आणि तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि काही प्रत्यक्षदर्शी आणि तांत्रिक मदतीच्या आधारे धक्कादायक बाब समोर आली. तपास थेट मृत व्यक्तीच्या घरात जाऊन थांबला. मृत व्यक्तीचे आपल्या पत्नीसोबत अनेकवेळा काही कारणाने खटले उडत होते. शेवटी पत्नीने पंजाब मधील दोघांना 2 लाखांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपींना दिल्लीमध्ये पळून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पत्नीसह तिघांनाही अटक केली आहे. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करत आहेत. ट्रान्स्फरचा व्यवसाय आसलेल्या व्यक्तीच्या खुनाची सुपारी आपल्याच पत्नीने दिल्याने परिसरात खळबळ माजली आहे. वाचा - लग्नात सप्तपदी घेण्याआधी असं काही घडलं अन् वधू-वराने केलं विष प्राशन पार्किंगमधून गाड्या चोरणारे अखेर जेरबंद पार्किंगमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवलेल्या चार चाकी वाहने डूप्लीकेट चावी किंवा ऑनलाईन टूल्सच्या आधारे चालू करून त्या चोरून नेल्याच्या घटना वाढत आहेत. अशात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मागील महिन्यातील दोन तक्रारी वरून तपास सुरू केला. मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, त्यात कुर्ला येथे एका चोरी झालेल्या गाडीचा तपास लागला. त्यात पोलिसांना काही संशयित सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनीच या चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले. यात एकूण चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्याच्याकडे असलेल्या 70 लाख रुपये किमतीच्या एकूण 15 वेगवेगळ्या कंपनीच्या कार हस्तगत केल्या आहे. त्यांच्यावर नवीमुंबई सह मुंबईमध्ये एकूण 15 गुन्ह्यांची उकल झाली आहे. अधिक तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.