मुंबई, 24 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून दिल्लीतील विविध भागात फेकले. आता या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रद्धा वालकर हिचा मोबाईल आफताबने खाडीत फेकल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत दिल्ली पोलीस मुंबईतील भाईंदर खाडीत मोबाईलच्या शोधासाठी आली आहे. दरम्यान त्या दृष्टीने त्यांनी दोन बोटींच्या साहाय्याने तपास सुरू केला आहे.
दिल्लीत क्रूर हत्या झालेल्या श्रद्धा वालकर हिच्या हत्याकांड प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आता आफताबने श्रद्धाचा मोबाईल फोन भाईंदरच्या खाडीत फेकल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडून आता भाईंदरच्या खाडीत शोध कार्य सुरू आहे. दोन बोटीच्या सहाय्याने खोल समुद्रात ही शोधमोहीम सुरु आहे.’
हे ही वाचा : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे ठेवले; आफताबने ठेवलाय हिशोब, धक्कादायक माहिती उघड
हा मोबाईल जर आफताबने समुद्रात फेकला असेल तर् त्याचा शोध घेणं पोलिसांना मोठं आव्हान असणार आहे. दोन बोटींच्या साहाय्याने एका बोटीवर 10 लोकांचं पथक त्यात 2 मरीन ड्रायव्हर, 3 स्थानिक चालक दिल्ली पोलीस, व माणिकपूर पोलिसांच पथकाचे सर्च ऑपरेशन सुरु आहे.
श्रद्धाने पोलिसांना लिहलं होत पत्र
या पत्रात लिहिलं आहे, की आफताब मला मारहाण करतो. त्याने मला आज धमकी दिली की तो माझी हत्या करून तुकडे करून फेकून देईल. मागील सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करून माझा छळ करत आहे. मात्र, पोलिसांत जाण्याची माझी हिंमत नाही, कारण तो मला मारण्याची धमकी देतो. तो मला मारहाण करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो, याबद्दल त्याच्या पालकांनाही माहिती आहे, असंही या पत्रात म्हटलं गेलं आहे.
या पत्रात लिहिलं आहे, की आफताब मला मारहाण करतो. त्याने मला आज धमकी दिली की तो माझी हत्या करून तुकडे करून फेकून देईल. मागील सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करून माझा छळ करत आहे.
हे ही वाचा : श्रद्धाची हत्या गळा दाबून नाही तर.. दिल्ली पोलिसांची नवीन थिअरी, घटनेची मोठी अपडेट
मात्र, पोलिसांत जाण्याची माझी हिंमत नाही, कारण तो मला मारण्याची धमकी देतो. तो मला मारहाण करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो, याबद्दल त्याच्या पालकांनाही माहिती आहे, असंही या पत्रात म्हटलं गेलं आहे.