जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पहिली पत्नी सोडून गेली, दुसऱ्या लग्नाच्या 30 दिवसात नवविवाहितेची हत्या; धक्कादायक कारण

पहिली पत्नी सोडून गेली, दुसऱ्या लग्नाच्या 30 दिवसात नवविवाहितेची हत्या; धक्कादायक कारण

पहिली पत्नी सोडून गेली, दुसऱ्या लग्नाच्या 30 दिवसात नवविवाहितेची हत्या; धक्कादायक कारण

नवरीने पतीकडे एका गोष्टीवरुन तक्रार केली होती. यानंतर सासू, सासरे आणि पतीने मिळून तरुणीला गोळी घातली.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगड, 5 मार्च : लग्नाला महिनाही झाला नव्हता आणि नवविवाहितेची गोळी घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पतीने स्वत:वरही गोळी चालवली. ही घटना हरयाणाच्या (Haryana News) पलवलमधील आहे. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे तरुणाचं दुसरं लग्न होतं. पहिली पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. पोलिसांनी केस दाखल करून तपास सुरू केला आहे. पलवल पोलिसांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशातील डूंगर सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, 7 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी आपली मुलगी रजनी (19) हिचं लग्न मथूरातील नौहवारसोबत लावून दिलं होतं. मात्र लग्नाच्या महिनाभरातच तिची हत्या करण्यात आली. लग्नानंतर रजनीला तिचा सासरा मोहन सिंह त्रास देत होता आणि तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. रजनीच्या कुटुंबाने सांगितलं की, रजनीचा सासरा वारंवार पाय दाबून द्यायला सांगत असे आणि यादरम्यान अश्लिल कृत्य करीत होता. रजनीने माहेरच्या सदस्यांना याबाबत सांगितलं. त्यांनी पतीला याबाबत तक्रार करण्यास सांगितलं. यानुसार तिने पतीला घडलेला प्रकार सांगितला. रजनीने जेव्हा आपल्या सासऱ्याबद्दल पतीकडे तक्रार केली तर सासूने तिला गप्प राहण्यास सांगितलं. शुक्रवारी रात्री रजनीची तिचा पती, सासू, सासरे यांनी गोळी मारून हत्या केली. माहेरची मंडळी सासरी आली तर तेथे रजनीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात होता. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवर आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल कर तपास सुरू केला आहे. हे ही वाचा- प्रेमात बाप ठरला अडथळा; माय-लेकींनी कायमच बंद केलं तोंड, दोघीही अटकेत पोलिसांनी सांगितलं की, तरुणाचं पहिलं लग्न आधी झालं होतं. मात्र काही दिवसांनंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. यानंतर त्याची पत्नी माहेरी निघून गेली. तरुणाचं दुसरं लग्न 7 फेब्रुवारी 2022 रोजी रजनीसोबत झालं. तरुणाने 4 मार्च रोजी रात्री रजनीला गोळी मारून हत्या केली. यानंतर त्याने स्वत:च्या हातावर गोळी मारली. गोळी लागल्यामुळे तरुण जखमी झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी पलवलमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात