जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रेमात बाप ठरला अडथळा; माय-लेकींनी कायमच बंद केलं तोंड, दोघीही अटकेत

प्रेमात बाप ठरला अडथळा; माय-लेकींनी कायमच बंद केलं तोंड, दोघीही अटकेत

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

प्रियकराशी सतत फोनवर बोलणं वडिलांना आवडत नव्हतं, आणि वडिलांनी टोकलेलं लेकीला आवडत नव्हतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटना, 4 मार्च : बिहारमधील (Bihar News) अरवल जिल्ह्यातील तितरा गावात एक मध्यम वयाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ (Crime News) उडाली आहे. या व्यक्तीचं नाव अरविंद सिंह असल्याचं समोर आलं आहे. प्रेमात अडथळा समजून या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. सध्या पोलिसांनी मृत अरविंद याची पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही केस प्रेमात अडथळा ठरल्यामुळे मुलगी आणि आई दोघांनी मिळून केल्याचं समोर आलं. सध्या हत्याचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्याकांडाच्या प्राथमिक तपासात आई व मुलीने एकत्रितपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी हत्येचे आरोपी आई-मुलीला ताब्यात घेतलं असून दोघांची चौकशी केली जात आहे. हत्येची ही घटना रामपूर चौराम पोलीस ठाणे हद्दातील आहे. तितरा गावातील राहणाऱ्यांनी सांगितलं की, अरविंद याच्या मुलीचं शेजारच्या मुलावर प्रेम होतं. मात्र वडिलांनी या प्रेमाचा स्वीकार केला नाही. त्यामुळे मुलगी आणि आईने मिळून त्याची हत्या केली आणि मृतदेह दुसरीकडे हलवला. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. हे ही वाचा- सप्तपदीपूर्वीच तुरुंगवास; प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरुणी झाली खोटी BSF अधिकारी प्रेमाच्या रस्त्याने जाणाऱ्या मुलीमध्ये जन्मदात्या बापाविषयी इतकी क्रूरता कशी आली, या विचाराने अनेकांच्या डोक्यात गारूड केलं आबे. प्रेमात हैवान झालेली मुलगी आणि आईविषयी गावात चर्चा केली जात आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, मुलगी आपल्या प्रियकराबरोबर सतत फोनवर बोलत असे. ही बाब तिच्या वडिलांना आवडत नव्हती. गेल्या रात्री यावरुन वडील तिला ओरडले. परिणामी आई-मुलीने मिळून अरविंद सिंह यांची हत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात