जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / शिक्षिका मुलगी म्हणाली, मी शिकलेली असून माझे निर्णय स्वत: घेईल; लेक्चरर पित्याने ऐकलं आणि...

शिक्षिका मुलगी म्हणाली, मी शिकलेली असून माझे निर्णय स्वत: घेईल; लेक्चरर पित्याने ऐकलं आणि...

मृत मुलगी आणि वडील

मृत मुलगी आणि वडील

शिक्षिका मुलगी म्हणाली, मी शिकलेली असून माझे निर्णय स्वत: घेईल. लेक्चरर पित्याने ऐकल्यावर धक्कादायक घटना घडली.

  • -MIN READ Kasganj,Uttar Pradesh
  • Last Updated :

कासगंज, 28 मार्च : देशात गुन्हेगारी वाढली आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील एका पॉश कॉलनीत राहणाऱ्या एका सरकारी कॉलेजच्या लेक्चररने आपल्या शिक्षिका मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. तसेच त्यानंतर स्वत:ही आत्महत्या करत आपले जीवन संपवले. आज तकने या न्यूज पोर्टलने बाबतचे वृत्त दिले आहे. मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले नरेंद्र सिंह यादव कासगंजच्या नागरिया येथील शेरवानी इंटर कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषयाचे लेक्चरर होते. कासगंज शहरातील आवास विकास कॉलनीमध्ये सुमारे 25 वर्षांपूर्वी त्यांनी घर बांधले. नरेंद्र यादव यांच्याशिवाय त्यांची पत्नी शशी यादव, मुलगी जुही यादव आणि एक मुलगा या घरात राहत होते. मुलगा सध्या नोएडामध्ये एसएससीची तयारी करत आहे. तर मुलगी जुही यादव कासगंज जिल्ह्यातील मिर्झापूर प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. एकाशी लग्न, दुसऱ्यासोबत अफेअर, आणि तिसऱ्याशी…., महिलेची निर्घृण हत्या जुहीला तिच्या मर्जीने लग्न करायचे होते. पण तिच्या वडिलांना म्हणजे नरेंद्र सिंह यादव यांना ही गोष्ट मंजर नव्हती. त्यांनी मुलीला खूप समजावलं, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. मी शिकलेली आहे. मी स्वतः निर्णय घेईन कारण मी माझ्या पायावर उभी आहे, या शब्दात जुहीने आई शशीसमोर वडिलांना स्पष्ट शब्दात उत्तर दिले होते. तिचे हे शब्द ऐकल्यावर तिच्या वडिलांचा संताप अनावर झाला आणि ते त्यांच्या रुममध्ये चालले गेले. यानंतर परवाना असलेली रायफलने त्यांनी तिच्यावर गोळी झाडत तिची हत्या केली. तसेच यानंतर तिच्या वडिलांनी स्वत:ही आत्महत्या करत आपले जीवन संपवले. पती आणि मुलीची ही अवस्था पाहून महिला शशी यादव यांनी आरडाओरडा सुरू केला, त्यानंतर आजूबाजूचे लोकही जमा झाले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पिता-मुलीला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एसपी सौरभ दीक्षित पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह रुग्णालयात नेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आणि नंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले. लेक्चरर नरेंद्र सिंह यादव यांच्या जवळचे असलेले मनोज चौहान यांनी सांगितले की, जुहीचे बँक अकाउंटंटसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. यामुळे मुलीचे वडील चांगलेच नाराज झाले होते. बदनामीच्या भीतीपोटी नरेंद्र यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात