जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मित्राला भेटून येतो म्हणाला, पण परतलाच नाही, लातूरच्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांसोबत नेमकं काय घडलं?

मित्राला भेटून येतो म्हणाला, पण परतलाच नाही, लातूरच्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांसोबत नेमकं काय घडलं?

मित्राला भेटून येतो म्हणाला, पण परतलाच नाही, लातूरच्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांसोबत नेमकं काय घडलं?

लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 19 वर्षीय विद्यार्थी मित्राला भेटायला जातो, असं सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

लातूर, 21 जुलै : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 19 वर्षीय विद्यार्थी मित्राला भेटायला जातो, असं सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण तरीही त्याचा शोध लागत नव्हता. रात्रभर त्याचे मित्र आणि कुटुंबिय त्याचा शोध घेत होते. तो बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका महाविद्यालयाच्या परिसरातील मुतारीत त्याचा संशयास्पद गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. पण त्याने आत्महत्या नेमकी का केली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. संबंधित घटना ही लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे घडली. अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालय परिसरातील मुतारीच्या असलेल्या लोखंडी चॅनल गेटला भगव्या उपरणेच्या साह्याने गळफास घेऊन संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. रामचंद्र उर्फ निशांत नारायण कोनाळे असं 19 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ( VIDEO : प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची सर्वात मोठी कारवाई, मुंबईतील घर जप्त ) निशांत हा 19 जुलैला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मित्राला भेटून येतो, असं सांगून घरातून बाहेर पडला होता. पण त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण त्याचा शोधच लागला नाही. निशांतच्या मित्रांनीदेखील त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या परिसरातील असलेल्या मुतारीच्या लोखंडी चॅनल गेटला भगव्या स्कार्फच्या साहाय्यानं निशांतनं गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनेची माहिती मिळताच घनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतक विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , suicide
  • First Published :
जाहिरात
जाहिरात