मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /रिंपलने टप्प्याटप्प्याने केले आईच्या मृतदेहाचे तुकडे; बॉयफ्रेंड घरी येताच केलं हे नाटक, प्रकरणात नवे खुलासे

रिंपलने टप्प्याटप्प्याने केले आईच्या मृतदेहाचे तुकडे; बॉयफ्रेंड घरी येताच केलं हे नाटक, प्रकरणात नवे खुलासे

lalbaug crime

lalbaug crime

पोलीस चौकशीत नवी माहिती हाती लागली आहे. या तरुणीने टप्प्याटप्प्याने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे केले असल्याचं समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 20 मार्च : मुलीने आईची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना लालबागच्या पेरू कंपाउंडमध्ये समोर आली. या घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. वीणा जैन (वय ५५) असं मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी मुलगी रिंपल जैन (वय २४) हिला अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अशातच आता पोलीस चौकशीत नवी माहिती हाती लागली आहे. या तरुणीने टप्प्याटप्प्याने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे केले असल्याचं समोर येत आहे.

आईचा मृत्यू झाल्याचं रिंपलला वेटर्सनी सांगितलं होतं, हत्या प्रकरणात नवा खुलासा

या प्रकरणी पोलीस रिंपलच्या प्रियकराचीही चौकशी करत आहेत. तोदेखील यात सहभागी असल्याचा संशय होता. मात्र आरोपी तरुणीने प्रियकरालाही अंधारात ठेवलं असल्याचं समोर येत आहे. दोघंही गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, अशी माहिती समोर येत आहे.. घरात वास येत असल्याने प्रियकराने रिंपलला विचारलंही होतं. मात्र बाथरूममध्ये चोकअप झालं असून कामगाराला बोलावलं असल्याचं तिने म्हटलं.

रिंपल या काळात प्रियकरालाही घरात घेत नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. सध्या काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत. वीणा जैन यांच्या मुलीला पोलिसांनी अटक केल्यानतंर आणखी काही जणांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात नवनीन माहिती समोर येत आहे. रिंपल जैनवर आई वीणा जैन यांची हत्या केल्याचा आरोप आहे. तसंच हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते तब्बल तीन महिने घरातच ठेवले होते. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर परिसरातील काही लोकांच्या मदतीने तिने हा प्रकार केला असल्याचा संशय आहे.

वीणा जैन या राहत असलेल्या इब्राहिम कासीम चाळीच्या तळमजल्यावरील एका दुकानातील दोन वेटर्सनी धक्कादायक अशी माहिती दिलीय. वीणा जैन या अखेरचं ज्या दिवशी दिसल्या तेव्हा त्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा वीणा जैन यांना त्यांच्या घरात नेणाऱ्या दोन वेटर्सनी सांगितले की, आम्ही वीणा यांची नस तपासली होती. त्यावेळी त्या श्वास घेत नसल्याचं रिंपललासुद्धा सांगितलं होतं. दरम्यान, वीणा या तोल जाऊन खाली पडल्या की त्यांना रिंपलनेच खाली ढकलले याचा शोध पोलीस घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder news, Shocking news