मुंबई, 18 मार्च : लालबागमधील वीणा जैन यांच्या हत्या प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. वीणा जैन यांच्या मुलीला पोलिसांनी अटक केल्यानतंर आणखी काही जणांची चौकशी केली जात आहे. या चौकशीत नवनी माहिती समोर येतेय. रिंपल जैनवर आई वीणा जैन यांची हत्या केल्याचा आरोप आहे. तसंच हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते तब्बल तीन महिने घरातच ठेवले होते. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर परिसरातील काही लोकांच्या मदतीने तिने हा प्रकार केला असल्याचा संशय आहे.
वीणा जैन या राहत असलेल्या इब्राहिम कासीम चाळीच्या तळमजल्यावरील एका दुकानातील दोन वेटर्सनी धक्कादायक अशी माहिती दिलीय. वीणा जैन या अखेरचं ज्या दिवशी दिसल्या तेव्हा त्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा वीणा जैन यांना त्यांच्या घरात नेणाऱ्या दोन वेटर्सनी सांगितले की, आम्ही वीणा यांची नस तपासली होती. त्यावेळी त्या श्वास घेत नसल्याचं रिंपललासुद्धा सांगितलं होतं.
पुष्पाचा भाऊ! नकली अंडे का फंडा, दारूची तस्करीसाठी लढवली शक्कल; आरोपींना अटक
आईचा तेव्हाच मृत्यू झाल्याचं आणि इतर नातेवाईकांना बोलावून घे असं तिला सांगितलं होतं असा खुलासा वेटर्सनी केलाय. रिंपलला जेव्हा वेटर्सनी नातेवाईकांना बोलावण्याचा सल्ला दिला तेव्हा तिने दोघांनाही तिथून जायला सांगितलं. मी सांभाळून घेईन असं रिंपलने दोघांना सांगितले होते. दरम्यान, वीणा या तोल जाऊन खाली पडल्या की त्यांना रिंपलनेच खाली ढकलले याचा शोध घेत आहेत.
आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली रिंपलने पोलिसांकडे दिली होती. पण तिने हे सर्व एकटीनेच केलं यावर पोलिसांना संशय आहे. यात तिला तिच्या प्रियकराने मदत केल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. शुक्रवारी त्याला आणि रिंपलला समोर बसवून चौकशी केली गेली. रिंपलने आईचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दोन दिवस तसाच घरात ठेवला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते घरी लपवून ठेवले. रिंपलने मृतदेहाचे तुकडे केल्याचं कबूल केलं असलं तरी हत्या केली नसल्याचं याआधी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.