मुंबईजवळ विवाहित महिलेच्या घरात घुसून केला बलात्कार, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईजवळ विवाहित महिलेच्या घरात घुसून केला बलात्कार, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महिला घरात एकटीच असल्याची संधी साधून या तीन नराधमांनी घरात प्रवेश केला.

  • Share this:

नालासोपारा, 16 ऑगस्ट : मुंबईजवळील नालासोपारा शहरात एका विवाहित महिलेवर घरात घुसून तीन नराधमांनी बलात्कार (Nalasopara Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांकडून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम परिसरात राहणारी महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करत असून तिचा पती रिक्षाचालक आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा चालक पती रिक्षात सीएनजी भरण्यासाठी मीरा भाईंदर येथे गेला असताना महिला घरात एकटीच असल्याची संधी साधून या तीन नराधमांनी घरात प्रवेश केला.

घरात घुसल्यानंतर तीनही नराधमांनी आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला व तिचा पती आल्यावर त्यालाही मारहाण करून तेथून पळ काढला.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना काल वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास नालासोपारा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, थेट घरात घुसून अत्याचार करण्यापर्यंत नराधमांची मजल गेल्याने या घटनेनंतर परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देऊन अशा प्रवृत्तींना आळा घालावा, अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: August 16, 2020, 11:39 AM IST

ताज्या बातम्या