जयपूर, 3 डिसेंबर: PUBG खेळण्याच्या नादात अल्पवयीन तरुणाने त्याच्या घरचे 3 लाख रुपये उडवल्याचा (kid spent 3 lakh rupees on PUBG game) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल गेम खेळण्याच्या नादापायी अनेक तरुण तरुणी पैसे उडवताना (Spending money on game) आपण पाहतो. अनेकदा आईवडिलांच्या अपरोक्ष त्यांच्या बँक खात्यातून मुलं (Financial fraud for money) पैसे गायब करतात किंवा चुकीच्या मार्गांचा वापर करत पैसे मिळवताना दिसतात. मित्राच्या भूलथापांना आणि दबावाला बळी पडत लाखो रुपये उधळणाऱ्या एका अल्पवयीन मुलाची अशीच धक्कादायक कहाणी समोर आली आहे.
पब्जीसाठी मित्राला पैसे
राजस्थानमधील झालावाडमध्ये ई-मित्र दुकान चालवणाऱ्या एका तरुणानं अल्पवयीन मुलाला धमकावत त्याच्याकडून 3 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. कधी गोड बोलून तर कधी धमकावून शाहबाज खान नावाचा हा तरुण अल्पवयीन तरुणाकडून पैसे उकळत असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
अशी करायचा फसवणूक
पब्जी गेम खेळण्याची सवय असलेला अल्पवयीन तरुण हा त्याच्याशेजारी ईःमित्र दुकान चालवणाऱ्या शाहबाज खानकडे वारंवार जात येत असे. याच काळात पब्जीसाठी लागणारी शस्त्रं आणि इतर ऑनलाईन साहित्य करण्यासाठी पैसे खर्च करण्याची सवय त्याने अल्पवयीन मुलाला लावली. हे सगळं खरेदी करण्यासाठी रेफरल कोड घेण्यासाठी तो पैसे मागायचा आणि पब्जी खेळण्याच्या हौसेपायी अल्पवयीन मुलगा त्याला पैसे आणून द्यायचा.
हे वाचा- ATM Cash withdrawal: 'या' तारखेपासून ATMमधून पैसे काढणं होणार महाग
वडिलांच्या अकाउंटवरून पैसे
शाहबाज खाननं अल्पवयीन मुलाकडून त्याच्या वडिलांच्या बँकेचे डिटेल्स मागवून घेतले. त्याचप्रमाणं त्यांचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबरदेखील घेतला. त्यानंतर या सगळ्या तपशीलांचा वापर करत पेटीएम अकाउंट सुरु केलं आणि त्यासाठी स्वतःचा नवा नंबर रजिस्टर केला. सुरुवातीला आरोपीनं अल्पवयीन तरुणाला 500 रुपयांचं ट्रॅन्झॅक्शन करवून घेतलं आणि त्यानंतर एकमागून एक अनेक व्यवहार केले. त्यामुळे मुलांच्या वडिलांचं 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.