जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / अल्पवयीन मुलगी गर्भवती, बलात्काराप्रकरणी TikTok स्टारला अटक

अल्पवयीन मुलगी गर्भवती, बलात्काराप्रकरणी TikTok स्टारला अटक

अल्पवयीन मुलगी गर्भवती, बलात्काराप्रकरणी TikTok स्टारला अटक

एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे या बलात्कारानंतर ही मुलगी गर्भवती राहिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

केरळ, 13 जून: केरळ (Kerala) मधल्या थ्रिसूरमध्ये 19 वर्षीय टिकटॉक स्टारला (TikTok Star) शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे या बलात्कारानंतर ही मुलगी गर्भवती राहिली आहे. अंबिली उर्फ विघ्नेश कृष्णा असं अटक करण्यात आलेल्या टिकटॉक स्टारचं नाव आहे. अंबिलीवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विघ्नेश आणि पीडित मुलीची मैत्री गेल्यावर्षी सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. मैत्री झाल्यामुळे दोघं एकमेकांना भेटू लागले. या भेटी दरम्यान विघ्नेशनं मुलीला लग्नाचं वचन दिलं. त्यानंतर तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा विघ्नेशला समजलं की मुलगी गर्भवती राहिली असून तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तो फरार झाला. पीडित मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर विघ्नेशचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. हेही वाचा-  सावध! Facebookवर अनोळख्या व्यक्तीशी मैत्री पडू शकते महागात या तपासादरम्यान पोलिसांना समजलं की, विघ्नेशनं पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. त्याचा परदेशात पळून जाण्याचा प्लान होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शक्कल लढवली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना सांगितलं की, विघ्नेशनचा पासपोर्ट तयार आहे. त्यानंतर ही माहिती देण्यासाठी शनिवारी त्याचे वडील जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये गेले. पोलिसांनी तेव्हा त्याच्या वडिलांचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं. विघ्नेशनला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात