उत्तर प्रदेश, 13 जून: फेसबुक (Facebook)वर अनोळख्या मुलाशी मैत्री करणं एका मुलाला चांगलंच महागात पडलं आहे. लखनऊ (Lucknow) मध्ये पोलिसांना एका तरुणाला अटक केली आहे. आरोपी तरुणानं फेसबुकच्या माध्यमातून पीडित मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार (Rape case)केला. धक्कादायक म्हणजे बलात्कार करतानाचा व्हिडिओ (Video) आरोपीनं शूट करत व्हायरल करण्याची धमकी (Threat) पीडित तरुणीला दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना लखनऊच्या अलीगंड बाराबंकी भागात घडली आहे. पीडित तरुणी आपल्या वहिनीसोबत राहत होती. दोन वर्षांपूर्वी पीडितेची मैत्री बनारसच्या एक तरुणासोबत फेसबूकद्वारे झाली होती. आरोपी तरुण हा मुजफ्फरनगरच्या एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर आरोपीनं पीडितेला मुजफ्फरनगरला भेटण्यास बोलावलं. आरोपी तरुण देत होता वारंवार धमकी आरोपीचा हेतू पूर्वीपासून चुकीचा होता. मात्र पीडितेच्या ते लक्षात आलं नाही. पीडितेनं आरोप केला आहे की, आरोपीनं माझ्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर माझा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपी मला वारंवार ब्लॅकमेल करत होता, असं पीडितेनं पोलिसांना सांगितलं. हेही वाचा- फास्टॅगचं अकाऊंट Unblcok करणं पडलं महागात व्हिडिओ असल्याची धमकी देऊन आरोपी वारंवार मला भेटायला बोलावयाचा. नाही आलीस तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी द्यायचा, असं पीडित तरुणीनं पोलिसांनी सांगितलं. अखेर सारख्या होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून तिनं पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.