कानपूर, 2 ऑक्टोबर : कानपूर दुर्घटनेची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला. मुख्यमंत्री योगीपासून पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनीच या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं. दारूच्या व्यसनापायी टॅक्ट्रर चालकाने 27 जणांचं आयुष्य उद्धवस्त केलं. नशेत असल्यामुळे चालकाला शुद्ध राहिली नाही आणि ट्रॉलीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडीसह तलावात पडला. यावेळी 22 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णालयात उपचारादरम्यान पाच जणांनी जीव सोडला. मृतांमध्ये सर्वाधिक महिलांचा आणि लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंडनच्या कार्यकर्मातून परतत असताना हा अपघात घडला. राजू निषाद ट्रॅक्टर चालवित होते. घटनेत जखमी झालेल्या एका महिलेने सांगितलं की, प्रवास सुरू केल्याच्या काही वेळात रस्त्यात एक देशी ढाबा लागला होता. तेथे ट्रॅक्टरची ट्रॉली थांबवण्यात आली आणि सर्व पुरुष दारू प्यायले. यानंतर राजूने ट्रॅक्टरची गती वाढवली. यावेळी त्याला अनेक वेळा अडवण्यात आलं. मात्र तो कोणाचच ऐकत नव्हता. हरदेव बाबा मंदिराजवळ पोहोचल्यानंतर राजूचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि किनाऱ्यावरील खड्ड्यात गाडी पडली. पावसामुळे येथे अक्षरश: तळं साचलं होतं. यावेळी गाडीत 35 ते 40 जणं होतं. त्यापैकी 27 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. भरधाव दुचाकी महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली, नालासोपाऱ्यातील घटनेचा VIDEO बुडाल्यामुळे आणि श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू… मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॉलीमधून प्रवास करणाऱ्या 27 जणांचा बुडून आणि श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. ट्रॉली तलावात पडल्यामुळे प्रवाशी ट्रॉलीच्या खाली दबले गेले. ज्यांना पोहता येत नव्हतं, त्यांचा यात बुडून मृत्यू झाला. जोपर्यंत मदतकार्य सुरू झालं, तोपर्यंत यातून अनेकांनी जीव सोडला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.